AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2021 Renault Triber : देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कारचं नवं मॉडल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Renault India ने त्यांची 2021 Triber भारतात लाँच केली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.30 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे,

2021 Renault Triber : देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कारचं नवं मॉडल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2021 renault triber
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 4:33 PM

नवी दिल्ली : Renault India ने त्यांची 2021 Triber भारतात लाँच केली आहे. भारतीय बाजारपेठेतील या कारची सुरुवातीची किंमत 5.30 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे, तर या कारच्या टॉप वेरिएंटची किंमत 7.82 लाख रुपये इतकी आहे. (2021 renault triber, cheapest 7-seater cars new model Launch in India)

कंपनीने आपल्या रेनॉ ट्रायबरचे (Renault Triber) 2021 मॉडेल नवीन रंग पर्यायांसह लाँच केले आहे. या व्यतिरिक्त, या कारच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये बदल करण्यात आले आहेत. जुन्या व्हर्जनप्रमाणे कंपनीने 2021 मॉडल चार वेरिएंट्समध्ये लाँच केलं आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ या वेरिएंट्सचा समावेश आहे.

2021 Renault Triber मध्ये काय आहे नवीन?

2021 Renault Triber मध्ये ड्युअल हॉर्नचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आरएक्सई आणि आरएक्सएल (RXE आणि RXL) ट्रिममध्ये कोणतेही नवीन फीचर्स जोडलेले नाहीत. RXT वेरिएंटच्या ORVMs मध्ये नवीन एलईडी टर्न इंडिकेटर आहेत. याशिवाय नवीन स्टीयरिंग-माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल यात देण्यात आले आहेत.

या कारच्या टॉप स्पेसिफिकेशन वाल्या RXZ वेरिएंटमध्ये मध्ये उंच आणि अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट देण्यात आली आहे. या कारमध्ये मिस्ट्री ब्लॅक रूफ आणि ऑप्शनल ड्युअल-टोन एक्सटीरियर असलेले ORVMs देण्यात आले आहेत.

Renault ने त्यांच्या 2021 ट्रायबर लाईनअपमध्ये एक नवीन सीडर ब्राउन पेंट स्कीम जोडली आहे. नवीन ड्युअल-टोन एक्सटीरियर कलर ऑप्शन केवळ 2021 Renault Triber च्या टॉप स्पेसिफिकेशन मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. 2021 Triber RXZ व्हेरिएंटसाठी ग्राहकांना अतिरिक्त 17,000 रुपये द्यावे लागतील.

परफॉर्मन्स

2021 Renault Triber मध्ये कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये 999 सीसी चं 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. या कारचं इंजिन 6250 आरपीएमवर 72 PS मॅक्सिमम पॉवर आणि 3500 आरपीएमवर 96Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारचं इंजिन 5-स्पीड मॅनुअल गियरबॉक्सने सुसज्ज आहे.

साईज आणि सस्पेन्शन

2021 Renault Triber ही कार 3990 मिलीमीटर लांब, 1739 मिलीमीटर रुंद आणि 1643 मिलीमीटर उंच आहे. या कारचा व्हीलबेस 2636 मिलीमीटर आणि ग्राऊंड क्लियरन्स 182 मिलीमीटर इतका आहे. यामध्ये 40 लीटर क्षमतेचा फ्युल टँक देण्यात आला आहे.

नवीन Renault Triber मध्ये फ्रंटला डिस्क आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. 2021 Renault Triber च्या फ्रंटला क्वाइल स्प्रिंग, लोव्हर ट्रायअँगलसह MacPherson Strut सस्पेन्शन देण्यात आलं आहे. तसेच या कारच्या रियरमध्ये Torsion बीम एक्सेल सस्पेन्शन देण्यात आलं आहे.

हेही वाचा

7 नव्या बदलांसह 2021 Maruti Suzuki Swift बाजारात, ‘या’ फीचर्समुळे कारची लोकप्रियता आणखी वाढेल

भारतीयांच्या मनात भरलेली TATA Tiago क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

किंमत 3 लाखांहून कमी, जबरदस्त मायलेज देणाऱ्या ‘या’ कार्सवर 60 हजारांचा डिस्काऊंट

(2021 renault triber, cheapest 7-seater cars new model Launch in India)

'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.