नव्या अवतारात 2021 Renault Triber MPV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉने (Renault) आपली लोकप्रिय एमपीव्ही रेनॉल्ट ट्रायबर (MPV Renault Triber) भारतात नवीन अवतारात सादर केली आहे.

नव्या अवतारात 2021 Renault Triber MPV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2021 Renault Triber Mpv
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 8:35 PM

मुंबई : फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉने (Renault) आपली लोकप्रिय एमपीव्ही रेनॉल्ट ट्रायबर (MPV Renault Triber) भारतात नवीन अवतारात सादर केली आहे. कंपनीने ही कार काही अपडेट्ससह सादर केली आहे. या 2021 रेनॉ ट्रायबरची (2021 Renault Triber) सुरुवातीची किंमत 5.30 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. (2021 Renault Triber Launched In India; Prices Start from Rs 5.30 Lakh)

कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन Triber MPV लुक, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत पूर्वीपेक्षा अधिक दमदार आहे. यामध्ये, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल फीचर्स उपलब्ध असतील, ज्याच्या मदतीने आपण कॉल घेण्यास किंवा ऑडिओ नियंत्रित करण्यास सक्षम असाल. या व्यतिरिक्त चालकाच्या जागेसाठी हाइट अॅडजेस्टमेंट फीचर, ड्युअल टोन एक्सटीरियर, एलईडी टर्न इंडिकेटर्स आणि नवीन Cedar Brown कलर देण्यात आला आहे.

2021 Renault Triber चं इंजिन आणि फीचर्स

या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या कारमध्ये 1.0 लीटरचे थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. हे इंजिन 70 बीएचपीची मॅक्झिमम पॉवर आणि 96 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

2021 Renault Triber च्या थर्ड रोमध्ये फोल्डेबल सीट देण्यात आली आहे, ज्याद्वारे लगेजसाठी स्पेस वाढवता येईल. सीट फोल्ड केल्यानंतर या कारमध्ये 625 लीटर बूट स्पेस तयार होईल. तसेच जर एखाद्या ग्राहकाची इच्छा असल्यास तो ही सीट हटवू शकतो, कारण या सीट्स डिटॅचेबल आहेत. तसेच कंपनीने या एमपीव्हीच्या टॉप मॉडलमध्ये 8 इंचांची इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि 4 एयरबॅग्ससह क्लायमेट कंट्रोल देण्यात आलं आहे.

चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध

रेनॉ ट्रायबर एमपीव्ही (Renault Triber MPV) ही कार चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ या व्हेरिएंट्सचा समावेश आहे. या कारचं बेस बेस व्हेरिएंट असलेल्या RXE व्हेरिएंटची किंमत 5.30 लाख रुपये इतकी आहे, तर टॉप मॉडेल असलेल्या RZX AMT व्हेरिएंटसाठी 7.65 लाख रुपये मोजावे लागतील. या कारचं मिड रेंज मॉडल असलेल्या RXL व्हेरिएंटसाठी कंपनीने 5.99 लाख रुपये ही किंमत निश्चित केली आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 6.50 लाख रुपये इतकी ठेवण्यात आहे. याशिवाय RXT च्या मॅन्युअल मॉडेलची किंमत 6.50 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 7.05 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या कारचे बेस मॉडेल केवळ मॅन्युअल ट्रान्समिशन गीयरबॉक्ससह येते.

इतर बातम्या

Mahindra कडून Scorpio वर बंपर डिस्काऊंट, 30 एप्रिलपर्यंत संधी

मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ‘या’ 5 गाड्या आहेत परफेक्ट, चांगलं मायलेज आणि शानदार लूक

KUV 100, XUV 500 आणि Scorpio सह महिंद्राच्या गाड्यांवर 3.06 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

(2021 Renault Triber Launched In India; Prices Start from Rs 5.30 Lakh)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.