ऑफिशियल लाँचिंगआधीच 2021 रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चं डिझाईन आणि फीचर्स लीक

रॉयल एनफील्ड (Royal Enfield) कंपनी या महिन्याच्या अखेरीस भारतीय बाजारात आपली न्यू जनरेशन Classic 350 मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत आहे.

ऑफिशियल लाँचिंगआधीच 2021 रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चं डिझाईन आणि फीचर्स लीक
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 3:43 PM

मुंबई : रॉयल एनफील्ड (Royal Enfield) कंपनी या महिन्याच्या अखेरीस भारतीय बाजारात आपली न्यू जनरेशन Classic 350 मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही मोटारसायकल अनेक वेळा टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली आहे. दरम्यान, ही बाईक अधिकृतपणे लाँच होण्यापूर्वी या बाईकचं डिझाईन आणि फीचर्स लीक झाले आहेत. (2021 Royal Enfield Classic 350 in new colour leaked before official launch)

या बाईकचा एक व्हिडीओ बुलेट गुरु या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. व्लॉगरने या व्हिडीओत RE क्लासिक 350 च्या नव्या पेंट स्कीमबद्दल माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही ही बाईक नवीन क्रोम आणि नवीन रेड कलर ऑप्शनमध्ये पाहू शकता. क्लासिक 350 वरील हा नवीन रंग प्रत्यक्षात इंटरसेप्टर 650 मोटरसायकलची आठवण करून देतो. 650 ट्विन्स प्रमाणे, क्लासिक 350 रेड अॅक्सेंट आणि अनेक पॅनल्सस येते. या बाईकचा फ्यूल टँक रेड कलरमध्ये रंगवला आहे.

बाईकच्या पुढील आणि मागील मडगार्डमध्ये रेड स्ट्रिप्स देण्यात आल्या आहेत, तर साइड पॅनल्स काळ्या रंगात दिसत आहेत. रॉयल एनफिल्ड क्रोम व्हर्जनमध्ये ब्लॅक पेंट ऑफर करेल. क्रोम फिनिश मोटरसायकलला रेट्रो लुक देते.

बाईकमध्ये किक-स्टार्ट फीचर मिळणार नाही

दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे की, या बाईकमध्ये किक-स्टार्ट फीचर मिळणार नाही, जे आधीच्या मॉडेल्समध्ये पाहिले गेले होते. अशी माहिती मिळाली आहे की, कंपनी त्यात किक-स्टार्ट फीचर देणार नाही, तर दुसरीकडे त्याला नवीन इंजिन, मीटर कन्सोल, ट्रिपर नेव्हिगेशन आणि बरेच काही मिळू शकते. न्यू-जनरेशन क्लासिक 350 बद्दल बोलायचे झाल्यास, ही बाईक पूर्णपणे ट्रान्सफॉर्म होऊन बाजारात दाखल होईल. ही बाईक कंपनीच्या J-प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. या बाईकच्या जुन्या स्पाय इमेजेसने आधीच क्लासिक 350 मोटरसायकलच्या काही खास डिझाईन्स उघड केल्या आहेत.

लाँचिंग कधी?

अहवालांनुसार, नवीन 2021 क्लासिक 350 भारतीय बाजारात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. न्यू जनरेशन मॉडेलच्या अधिकृत स्क्रीनिंगपूर्वी, लीक झालेल्या छायाचित्रांमध्ये बाईकची संपूर्ण माहिती समोर आली आहे. या बाईकमध्ये टेक्नोलॉजी आणि एक्सटीरियर लुक्समध्ये बरेच बदल पाहायला मिळू शकतात.

दमदार इंजिन

आगामी क्लासिक 350 नवीन रॉयल एनफील्ड येथे मीटियर 350 मधील अनेक टेक्नोलॉजिकल गोष्टी अडॅप्ट करणार आहे. याचा पॉवरट्रेन आणि जे-प्लॅटफॉर्म मीटियरपासून घेतलेला असेल. ही 349cc सिंगल-सिलिंडर, DOHC इंजिनद्वारे चालवली जाईल जे मीटियर 350 मधून घेतले आहे, जे बाईकमधील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक आहे. आधुनिक इंजिन व्यतिरिक्त, अपडेटेड क्लासिक 350 ट्रिपर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन वापरेल जे सर्वात आधी मीटियर 350 मध्ये पाहायला मिळाले होते.

किंमत

अशा परिस्थितीत, नवीन जनरेशनमध्ये बदल झाल्यानंतर, क्लासिक 350 अधिक महाग होईल यात शंका नाही. या बाईकची प्रारंभिक किंमत 1.85 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. रॉयल एनफील्ड आपल्या बाइक्समध्ये अनेक बदल करत आहे. कंपनी सतत आपल्या जुन्या मॉडेल्सना नवीन फिचर्ससह अपडेट करत आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे नुकतील लाँच झालेली नवी रॉयल एनफील्ड हिमालयन.

RE दरवर्षी 4 बाईक लाँच करणार

रॉयल एनफील्ड दरवर्षी 4 नवीन बाईक लॉन्च करण्याची योजना आखत आहे. 2020 पासून आत्तापर्यंत, कंपनीने त्यांच्या अनेक बाईक्सची चाचणी केली आहे. अशा परिस्थितीत, अलीकडील काही लीक झालेल्या फोटोंमध्ये, हिमालयन एका नवीन लुकमध्ये पाहायला मिळाली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये हिमालयन अपडेट केली गेली, त्यानंतर कंपनीने या नवीन मॉडेलची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. परंतु आता असे म्हटले जात आहे की, कंपनी रॉयल एनफील्ड हिमालयनची आणखी एक अपडेटेड आवृत्ती विकसित करत आहे.

नवीन क्लासिक 350 सध्याच्या मॉडेलसाठी थेट रिप्लेसमेंट असेल जी नुकतीच अधिक महाग झाली आहे. नव्याने लागू केलेल्या किंमतींमध्ये वाढीसह, तुम्हाला आता क्लासिक 350 टॉप-ऑफ-द-लाइन पेंट स्कीमसाठी 1,79,782 लाख रुपये (एक्स-शोरूम, अहमदाबाद) ते 2,06,962 लाख रुपये (एक्स-शोरूम, अहमदाबाद) मोजावे लागतील.

इतर बातम्या

अवघ्या 25 हजारात खरेदी करा जबरदस्त मायलेज देणारी बाईक, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Honda ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 130 किलोमीटर रेंज

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरला अवघ्या 4 दिवसात 30,000 बुकिंग्स, 1947 रुपये देऊन तुम्हीही करु शकता बुक

(2021 Royal Enfield Classic 350 in new colour leaked before official launch)

चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.