Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी किंमतीत ढासू फीचर्स, Royal Enfield ची शानदार बाईक ऑगस्ट अखेर लाँच होणार

नवीन 2021 क्लासिक 350 भारतीय बाजारात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. न्यू जनरेशन मॉडेलच्या अधिकृत स्क्रीनिंगपूर्वी, लीक झालेल्या छायाचित्रांमध्ये बाईकची संपूर्ण माहिती समोर आली आहे.

कमी किंमतीत ढासू फीचर्स, Royal Enfield ची शानदार बाईक ऑगस्ट अखेर लाँच होणार
2021 Royal Enfield Classic 350
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 7:02 AM

मुंबई : रॉयल एनफील्ड (Royal Enfield) कंपनी लवकरच भारतीय बाजारात नवीन युगाची क्लासिक 350 मोटरसायकल लॉन्च करणार आहे. अहवालांनुसार, नवीन 2021 क्लासिक 350 भारतीय बाजारात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. न्यू जनरेशन मॉडेलच्या अधिकृत स्क्रीनिंगपूर्वी, लीक झालेल्या छायाचित्रांमध्ये बाईकची संपूर्ण माहिती समोर आली आहे. या बाईकमध्ये टेक्नोलॉजी आणि एक्सटीरियर लुक्समध्ये बरेच बदल पाहायला मिळू शकतात. (2021 Royal Enfield Classic 350 ready to launch in August)

आगामी क्लासिक 350 नवीन रॉयल एनफील्ड येथे मीटियर 350 मधील अनेक टेक्नोलॉजिकल गोष्टी अडॅप्ट करणार आहे. याचा पॉवरट्रेन आणि जे-प्लॅटफॉर्म मीटियरपासून घेतलेला असेल. ही 349cc सिंगल-सिलिंडर, DOHC इंजिनद्वारे चालवली जाईल जे मीटियर 350 मधून घेतले आहे, जे बाईकमधील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक आहे. आधुनिक इंजिन व्यतिरिक्त, अपडेटेड क्लासिक 350 ट्रिपर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन वापरेल जे सर्वात आधी मीटियर 350 मध्ये पाहायला मिळाले होते.

नवीन क्लासिक 350 सध्याच्या मॉडेलसाठी थेट रिप्लेसमेंट असेल जी नुकतीच अधिक महाग झाली आहे. नव्याने लागू केलेल्या किंमतींमध्ये वाढीसह, तुम्हाला आता क्लासिक 350 टॉप-ऑफ-द-लाइन पेंट स्कीमसाठी 1,79,782 लाख रुपये (एक्स-शोरूम, अहमदाबाद) ते 2,06,962 लाख रुपये (एक्स-शोरूम, अहमदाबाद) मोजावे लागतील.

किंमत

अशा परिस्थितीत, नवीन जनरेशनमध्ये बदल झाल्यानंतर, क्लासिक 350 अधिक महाग होईल यात शंका नाही. या बाईकची प्रारंभिक किंमत 1.85 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. रॉयल एनफील्ड आपल्या बाइक्समध्ये अनेक बदल करत आहे. कंपनी सतत आपल्या जुन्या मॉडेल्सना नवीन फिचर्ससह अपडेट करत आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे नुकतील लाँच झालेली नवी रॉयल एनफील्ड हिमालयन.

दरवर्षी 4 बाईक लाँच करणार

रॉयल एनफील्ड दरवर्षी 4 नवीन बाईक लॉन्च करण्याची योजना आखत आहे. 2020 पासून आत्तापर्यंत, कंपनीने त्यांच्या अनेक बाईक्सची चाचणी केली आहे. अशा परिस्थितीत, अलीकडील काही लीक झालेल्या फोटोंमध्ये, हिमालयन एका नवीन लुकमध्ये पाहायला मिळाली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये हिमालयन अपडेट केली गेली, त्यानंतर कंपनीने या नवीन मॉडेलची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. परंतु आता असे म्हटले जात आहे की, कंपनी रॉयल एनफील्ड हिमालयनची आणखी एक अपडेटेड आवृत्ती विकसित करत आहे.

इतर बातम्या

फेस्टिव्हल ऑफर! Yamaha च्या गाड्यांवर बंपर डिस्काऊंट, हजारोंची बचत करण्याची संधी

Ola Electric Scooter ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

वृद्ध, दिव्यांग व्यक्तींसाठी कोमाकीची खास इलेक्ट्रिक स्कुटर; भारतीय बाजारपेठेत विक्रीला सुरुवात

(2021 Royal Enfield Classic 350 ready to launch in August)

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.