शानदार 2021 Volkswagen Tiguan भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Dec 07, 2021 | 5:19 PM

2021 Volkswagen Tiguan ही कार आज 32 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत (एक्स-शोरूम) लॉन्च करण्यात आली आहे. ही पाच सीटर एसयूव्ही फोक्सवॅगनच्या भारत 2.0 धोरणाचा भाग आहे.

शानदार 2021 Volkswagen Tiguan भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2021 Volkswagen Tiguan
Follow us on

मुंबई : 2021 Volkswagen Tiguan ही कार आज 32 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत (एक्स-शोरूम) लॉन्च करण्यात आली आहे. ही पाच सीटर एसयूव्ही फोक्सवॅगनच्या भारत 2.0 धोरणाचा भाग आहे. ऑटोमेकरने भारतात चार नव्या एसयूव्ही लाँच करण्याची घोषणा केली आहे, त्यापैकी ही एक एसयूव्ही आहे. नवीन प्रीमियम SUV फोक्सवॅगनच्या MQB प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, जी ऑटोमेकरने ऑफर केलेल्या इतर अनेक मॉडेल्ससारखीच आहे. (2021 Volkswagen Tiguan launched at price of 32 lakh rupees)

नवीन जनरेशन Tiguan SUV काही उल्लेखनीय बदलांसह बाजारात दाखल झाली आहे. प्रीमियम SUV मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे बदल महत्त्वाचे असू शकतात. हे नवीन मॉडेल फक्त पेट्रोल व्हेरिएंटमध्ये येईल आणि 2.0 लीटर फोर-सिलेंडर टर्बो-पेट्रोल मोटर इंजिनद्वारे सुसज्ज आहे. हे इंजिन 190hp पॉवर आउटपुट आणि 320Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. कंपनीने इंजिनला 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडले आहे. फोक्सवॅगनची 4MOTION ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम या SUV साठी स्टँडर्ड म्हणून येईल.

इंटीरियर आणि सेफ्टी फीचर्स

नवीन टिगुआनच्या इंटीरियरमध्ये डिजिटल व्हर्च्युअल कॉकपिट ड्रायव्हर डिस्प्लेसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह सुसज्ज आहे. SUV ला 30 रंगांची एम्बिएंट लायटिंग, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि एक पॅनोरमिक सनरूफ देखील मिळते जे प्रीमियम सेगमेंटला एका उंचीवर घेऊन जाते. या कारच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, कारला 6 एअरबॅग्ज, ड्राईव्ह आणि क्रूझ कंट्रोल, ABS, ESP, हिल डिसेंट कंट्रोल, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टम यांसारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

एक्सटीरियर आणि इतर फीचर्स

फॉक्सवॅगनने SUV चं एक्सटीरियर अपडेट केलेल्या नवीन बदलांसह क्लीन ठेवलं आहे. क्रोम अॅक्सेंटसह रिफाइन फ्रंट ग्रिल एसयूव्हीला स्टायलिश लूक देते. एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह एलईडी मॅट्रिक्स हेडलॅम्प आणि ट्रँगल फॉग लॅम्प असलेले नवीन बंपर या एसयूव्हीला त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक लूक देतात. टेलगेटच्या मध्यभागी टिगुआन अक्षरांसह स्लिमर एलईडी टेललाइट्ससह, एसयूव्हीचा मागील भाग कॉम्पॅक्ट दिसतो.

इतर बातम्या

ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी

चिप संकटावर TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर


(2021 Volkswagen Tiguan launched at price of 32 lakh rupees)