2021 Volvo XC90 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

olvo Cars India ने अलीकडेच त्यांच्या फ्लॅगशिप SUV XC90 चे फेसलिफ्टेड व्हेरिएंट लॉन्च केले आहे ज्याची किंमत 89.9 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे.

2021 Volvo XC90 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
New Volvo XC90
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 4:35 PM

मुंबई : Volvo Cars India ने अलीकडेच त्यांच्या फ्लॅगशिप SUV XC90 चे फेसलिफ्टेड व्हेरिएंट लॉन्च केले आहे ज्याची किंमत 89.9 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. नवीन SUV नवीन पेट्रोल माइल्ड-हायब्रिड इंजिनसह येते. यापूर्वी, कंपनीने S90 आणि XC60 या दोन गाड्या भारतीय बाजारपेठेत माइल्ड-हायब्रिड मोटरसह लॉन्च केल्या होत्या. (2021 Volvo XC90 mild-hybrid launched in India at price of 89.90 lakh rupees)

व्‍होल्वो कार्स इंडियाच्या व्‍यवस्‍थापकीय संचालिका ज्योती मल्होत्रा यांनी सांगितले की, “नवीन XC90 लाँच करण्यासह, आम्ही या तिमाहीत तीन नवीन पेट्रोल माइल्‍ड-हायब्रीड मॉडेल लॉन्‍च केले आहेत. आमच्या ग्राहकांनी आमच्या ब्रँडवर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्हाला त्यांच्यासाठी नवीन टेक्नोलॉजी पॅक्ड मॉडेल सादर करण्याचा विश्वास मिळाला आहे. डिझेल ते पेट्रोलमध्ये ट्रान्झिट करण्याची आमची वचनबद्धता आणि भारतीय बाजारपेठ विकसित करण्यासाठी आमचे सर्वोत्तम धोरण दर्शवते.”

नवीन Volvo XC90 मध्ये खास अपडेट

या कारला अनेक नवीन अपडेट्स मिळाले आहेत. नवीन XC90 आता व्होल्वो लेटेस्ट एअर क्लीनर तंत्रज्ञानासह येते. हे फीचर केबिनमधील हवेची गुणवत्ता अॅडजस्ट करते आणि बाहेरील हवेपेक्षा आतील वातावरण स्वच्छ ठेवते. XC90 मधील इतर अपडेट्समध्ये हेड-अप डिस्प्ले समाविष्ट आहे जे ड्रायव्हरला वाहनाचा वेग, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन अॅलर्ट आणि डॅशबोर्डवर अधिक माहिती देते.

नवीन XC90 फक्त B6 इंस्क्रिप्शन (पेट्रोल माईल्ड-हायब्रिड) कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल आणि त्यात Bowers & Wilkins (1400 W, 19 स्पीकर), हीटेड फ्रंट सीट्स, मसाज फंक्शन (फ्रंट सीट्स), अॅडव्हान्स्ड साऊंड, PM 2.5 सेन्सर्ससह एअर क्वालिटी सिस्टम मिळते. पॅनोरमिक सनरूफ सारखी वैशिष्ट्ये यात उपलब्ध आहेत.

8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन

अपडेटेड व्होल्वो फ्लॅगशिप SUV च्या केंद्रस्थानी एक नवीन माइल्ड-हायब्रिड मोटर आहे जी 1969 cc ला रिप्लेस करते आणि 300 hp मॅक्सिमम पॉवर आणि 420 Nm पीक टॉर्क निर्माण करते. इंजिन 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे जे व्हील्सना पॉवर देतं. XC90 पेट्रोल व्हेरिएंट चार कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये क्रिस्टल व्हाइट पिअर, पाइन ग्रे, ओनिक्स ब्लॅक आणि डेनिम ब्लू या रंगांचा समावेश आहे.

Volvo XC90 ही स्केलेबल प्रोडक्ट आर्किटेक्चर (SPA) वर लॉन्च केलेली पहिली कार होती, जे वॉल्वोचे लेटेस्ट मॉड्यूलर प्रोडक्ट प्लॅटफॉर्म आहे आणि सर्व व्होल्वो कारमध्ये समाविष्ट आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(2021 Volvo XC90 mild-hybrid launched in India at price of 89.90 lakh rupees)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.