2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

2022 Hyundai Creta फेसलिफ्टने Gaikindo Indonesia International Auto Show (GIIAS) 2021 मध्ये जागतिक पदार्पण केले आहे. कॉम्पॅक्ट SUV चं अपडेटेड व्हर्जन इंडोनेशियामध्ये विकसित होणारे पहिले Hyundai प्रोडक्ट असेल.

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?
Hyundai Creta Facelift
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 7:10 AM

मुंबई : 2022 Hyundai Creta फेसलिफ्टने Gaikindo Indonesia International Auto Show (GIIAS) 2021 मध्ये जागतिक पदार्पण केले आहे. कॉम्पॅक्ट SUV चं अपडेटेड व्हर्जन इंडोनेशियामध्ये विकसित होणारे पहिले Hyundai प्रोडक्ट असेल आणि त्यात मोठे कॉस्मेटिक बदल, नवीन फीचर्स आणि सुधारित सुरक्षा साधने (सेफ्टी टूल्स) असतील. इंडोनेशियन-स्पेक क्रेटा आता अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमसह (ADAS) येते. (2022 Hyundai Creta Facelift Makes Global Debut, will launch in India soon)

इंडोनेशियामध्ये, Hyundai Creta फेसलिफ्ट चार व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाईल, ज्यामध्ये अॅक्टिव्ह, ट्रेंड, स्टाईल आणि प्राइम यांचा समावेश असेल. या व्हेरिएंटच्या किंमती 279 मिलियन IDR ते 399 मिलियन IDR च्या दरम्यान असेल, जी टॅक्सच्या आधी 14.56 लाख ते 20.82 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. SUV ला प्री-फेसलिफ्ट क्रेटा सारखाच सिल्हूट मिळतो, तथापि, कारची स्टाइल रिफ्रेश केली गेली आहे आणि ती आता नवीन लुकसह सादर करण्यात आली आहे.

SUV ला नवीन LED हेडलॅम्प, रुंद एअरडॅमसह नवीन बंपर, ग्रिल आणि बंपरची आऊटलाईन करण्यासाठी मोठे सिल्वर इन्सर्ट आणि अधिक मस्क्यूलर कॅरेक्टर लाईन्सदेखील आहेत. यात नवीन 17 इंच डायमंड कट अलॉय व्हील आणि साइड स्कर्ट वगळता, एसयूव्हीचे प्रोफाइल प्री-फेसलिफ्ट मॉडेलसारखे दिसते. क्रेटाच्या मागील बाजूस एक आकर्षक डिझाइन, एलईडी टेललॅम्प आणि नवीन रियर बंपर आहे. SUV ला ब्लॅक रुफसह टू-टोन बॉडी कलर ट्रीटमेंट मिळते.

शानदार इंटीरियर

2022 Hyundai Creta फेसलिफ्ट प्रीमियम ऑल-ब्लॅक इंटीरियरसह समान लेआउटसह येते. नवीन 10.25-इंच फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे यातील सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम हाऊसिंगचे डिझाइन देखील बदलले आहे आणि आता तुम्हाला सध्याच्या क्रेटा प्रमाणेच 8 इंचाच्या टचस्क्रीन डिस्प्लेच्या दोन्ही बाजूला बटणे आणि डायल मिळतात. ही सिस्टम कंपनीच्या ब्लूलिंक कनेक्टेड कार सिस्टमसह Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह इतर कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सुसज्ज आहे.

ह्युंडई क्रेटा फेसलिफ्टचं इंजिन

हुड अंतर्गत, इंडोनेशिया-स्पेक ह्युंडई क्रेटा फेसलिफ्ट फक्त एका इंजिन पर्यायासह येते. यात 1.5-लीटर MPI एस्पिरेटेड पेट्रोल मोटर जे 1,497 cc चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते. जे 6,300 rpm वर 113 bhp पॉवर आणि 450 rpm वर 144 Nm पॉवर निर्माण करते. मोटार 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पर्यायी iVT (इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन) ऑटोमॅटिक युनिटशी जोडलेली आहे. Hyundai India ने गेल्या वर्षी 2020 मध्ये नवीन-जनरेशन Creta लाँच केली होती, त्यामुळे ही SUV भारतात लाँच थोडा वेळ लागेल.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(2022 Hyundai Creta Facelift Makes Global Debut, will launch in India soon)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.