मोठी ड्रायव्हिंग रेंज, शानदार लुकसह 2022 MG ZS EV लाँचिंगसाठी सज्ज, बुकिंग्स सुरु

एमजी मोटरच्या (MG Motor) बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही 2022 (ZS EV 2022) च्या नवीन अवतारामध्ये 10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्‍ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले (Apple Carplay) कनेक्टीव्हिटी असणार आहे.

मोठी ड्रायव्हिंग रेंज, शानदार लुकसह 2022 MG ZS EV लाँचिंगसाठी सज्ज, बुकिंग्स सुरु
MG ZS EV (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 2:27 PM

मुंबई : एमजी मोटरच्या (MG Motor) बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही 2022 (ZS EV 2022) च्या नवीन अवतारामध्ये 10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्‍ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले (Apple Carplay) कनेक्टीव्हिटी असणार आहे. नवीन झेडएस ईव्हीमध्ये एमजीचे जागतिक यू्.के. डिझाइन फीचर्स सामावलेले आहेत, ज्‍यामुळे सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना लेजर व कम्फर्ट आणि लक्झरी घटकांची सुधारित श्रेणी देण्यात आली आहे. आपल्या सीएएसई (कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड व इलेक्ट्रिक) दृष्टीकोनामधून संचालित अत्याधुनिक ऑटोमेकरने आज ऑटोमोबाइल सेगमेंटमध्ये व्यापक अनुभवांमध्ये वाढ केली आहे. झेडएस ईव्ही सोबत एमजी ग्राहकांना 5-मार्गी चार्जिंग परिसंस्था देत आहे, ज्यामध्ये निवासस्थानी/ कार्यालयांमध्ये मोफत एसी फास्ट-चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिंग केबल, डिलरशिप्समध्ये डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन्स, 24 X 7 चार्ज-ऑन-दि-गो फॅसिलिटी (5 शहरांमध्ये) आणि सॅटेलाइट शहरे व टूरिस्ट हब्स येथे चार्जिंग स्टेशन्स यांचा समावेश आहे. दरम्यान, भारतात उपस्थित असलेल्या MG डीलरशिपने 2022 MG ZS EV साठी प्री-बुकिंग सुरू केली आहे.

शानदार फीचर्स

झेडएस ईव्ही 2022 मध्ये फ्रण्ट-कव्हर्ड ग्रिल आणि आता एमजी लोगोच्या डाव्या बाजूस ठेवण्यात आलेले चार्जिंग सॉकेट, सनरूफ व नवीन 17-इंच रिफ्रेश डिझाइन अलॉय व्हील्स आहेत. नवीन झेडएस ईव्ही अपडेटेड फ्रण्ट फेशिया, एलईडी हेडलॅम्‍प्‍स, डीआरएल, नवीन अलॉय व्हील डिझाइन, नवीन बंपर आणि नवीन टेल-लाइट डिझाइनसह येईल. ही कार प्रवाशांना रिअर-सीटिंग झोनमध्ये सर्वोत्तम दर्जाच्या आरामदायी प्रवासाची खात्री देते. यामध्ये रिअर सीट सेंटर आर्म-रेस्टसह कपहोल्डर्स व सेंटर हेड-रेस्ट आहे. नवीन झेडएस ईव्हीमध्ये मागील प्रवाशांना अधिक आरामदायी सुविधा देण्यासाठी रिअर एअर-कंडिशनिंग वेण्ट्स देखील असणार आहेत.

4000 झेडएस ईव्हींची विक्री

एमजी मोटरने 2020 मध्ये झेडएस ईव्ही लाँच केली आणि ही कार भारतातील कोणत्याही ईव्हीच्या तुलनेत अधिक लांबचे अंतर कापण्याची खात्री देणारी इलेक्ट्रिक वेईकल सेगमेंटमधील सर्वात व्यावहारिक ऑफरिंग आहे. एमजी मोटरने भारतामध्ये झेडएस ईव्हीची दोन यशस्वी वर्षे पूर्ण केली, जी देशातील स्थिर गतीशीलतेप्रती ब्रॅण्डच्या कटिबद्धतेची हॉलमार्क राहिली आहेत. दोन वर्षांमध्ये एमजीने जवळपास 4000 झेडएस ईव्हींच्या विक्रीची विक्रमी नोंद केली आहे. एमजी या सेगमेंटमध्ये 27 टक्के बाजारपेठ हिस्सा संपादित करत भारतातील दुसरी सर्वात मोठी ईव्ही उत्पादक कंपनी बनली आहे.

एमजी मोटरने भारतामध्ये अनेक ‘फर्स्ट वेईकल्स’ सादर केल्या आहेत, जसे भारताची पहिली इंटरनेट एसयूव्ही – एमजी हेक्टर, भारताची पहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही – एमजी झेडएस ईव्ही, भारताची पहिली ऑटोनॉमस (लेव्‍हल 1) प्रिमिअम एसयूव्ही – एमजी ग्लॉस्टर आणि वैयक्तिक एआय असिस्टण्ट व ऑटोनॉमस (लेव्हल 2) तंत्रज्ञान असलेली भारताची पहिली एसयूव्ही – एमजी अॅस्टर.

MG ZS EV मध्ये स्ट्राँग बॅटरी

या कारमध्ये कंपनीने 72 kWh ची मोठी बॅटरी वापरली आहे, जी सिंगल चार्जवर 439 किमी रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. या कारचे सध्याचे मॉडेल सिंगल चार्जवर 262 किमीचे अंतर कापू शकते. कंपनीने सांगितले की, पुढच्या वर्षापर्यंत 51 kWh बॅटरी पॅक लॉन्च केला जाईल, जो सिंगल चार्जवर 318 किमीचे अंतर पार करू शकेल.

नव्या MG ZS EV ची खासियत

पेट्रोल इंजिनसह एमजी झेडएस प्रमाणेच ईव्हीमध्येदेखील नवीन शार्प एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट्स देण्यात आले आहेत. यामध्ये ग्रिल स्वतंत्रपणे देण्यात आलेलं नाही, यातील ग्रिल बंपरचाच एक भाग आहे आणि तो कारच्या बॉडी कलरमध्ये आहे. बॅक पॅनेलवर असलेल्या प्रोफाइलमध्ये थोडासा बदल देखील केला आहे. यामध्ये अलॉय व्हील्सही अपडेट करण्यात आले आहेत.

सध्याच्या MG ZS EV मधील फीचर्स

ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

इतर बातम्या

आता इलेक्ट्रिक गाड्यांमधल्या बॅटरी रिसायकल होणार, Ford आणि Volvo ने सुरु केली स्टार्टअप कंपनी

कार खरेदीसाठी बँका किती टक्के व्याजदराने कर्ज देतायत? लोन व प्रक्रियेबद्दल ‘या’ गोष्टी अवश्‍य जाणून घ्या

BMW ची इलेक्ट्रिक Mini Cooper SE भारतात लाँचिंगसाठी सज्ज, कशी असेल नवीन EV?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.