AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2023 Royal Enfield Bullet 350 लवकरच होणार लाँच, जुन्या मॉडेलच्या तुलनेत काय आहे वेगळं? जाणून घ्या

रॉयल एनफिल्ड बुलटचे अनेक चाहते आहेत. बुलेटवरून फेरफटका मारणं आणि इतरांनी त्याकडे बघणं काही औरच असतं. आता कंपनीने या बाइकच्या फीचर्स आणि इंजिन पॉवरमध्ये काही अपडेट करणार आहे.

2023 Royal Enfield Bullet 350 लवकरच होणार लाँच, जुन्या मॉडेलच्या तुलनेत काय आहे वेगळं? जाणून घ्या
Royal Enfield Bullet 350 नव्या ढंगात होणार लाँच, जाणून घ्या खासियत आणि किंमतImage Credit source: Pixabay.Com
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 2:45 PM

मुंबई – रॉयल एनफिल्ड बुलेट बाइकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. बुलेटचा आकर्षक लूक आणि त्यावर बसल्यानंतर दिसणारं व्यक्तिमत्त्व काही वेगळंच असतं. आता रॉयल एनफिल्ड लवकरच भारतात नव्या पिढीची बुलेट लाँच करण्याची शक्यता आहे. 2023 बुलेट 350 देशात परवडणाऱ्या किमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. बुलेट 350 भारतात रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त बाइक आहे. नव्या मॉडेलमध्ये चांगलं डिझाईन, अपडेटेड इंजिन आणि काही सेफ्टी फीचर्स असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाँचिंगपूर्वीच या गाडीची चर्चा रंगली आहे.

2023 रॉयल एनफिल्ड बुलेट 350 डबल क्रेडल चेसिसवर तयार केली जाणार आहे. सध्याचं मॉडेल सिंगल डाउनट्यूब फ्रेमवर तयार केलं आहे. नव्या बाइकची स्टाइल क्लासिक 350 बाइकसारखी असण्याची शक्यता आहे. नव्या बुलेटमध्ये स्टायलिश हँडलबार, राउंड मिरर, सिंगल सीट, पीशूटर एग्जॉस्ट आणि ट्यूबलर ग्रॅब रेल नव्याने असेल.

बाइकमध्ये क्रोम फिनिश असलेला गोल हॅलोजन हेडलाइट आणि टेललँप, हॅलोजन टर्न सिग्नलसह येईल. बाइकमध्ये वायर स्पोक्ड रिम्ससुद्धा दिले जाऊ शकतात. नव्या बाइकच्या इंजिनमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

बुलेटचं इंजिनमध्ये काय खासियत

बुलेटच्या नवं इंजिनमध्ये 349 सीसी एअर आणि ऑइल कूल्ड एसओएचसी दिलं जाऊ शकते.हे इंजिन 20.2 एचपी पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. सध्याचं मॉडेल 346 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिनसह येते. हे इंजिन 19 एचपी पॉवर आणि 28 एनएम टॉर्क जनरेट करते. असं असलं तरी या बाइकमध्ये आधीप्रमाणे 5 स्पीड गिअरबॉक्स दिला जाईल.

सुरक्षेसाठी बुलेटच्या मागच्या आणि पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक असेल. सध्याच्या मॉडेलमध्ये फक्त पुढच्या चाकाला डिस्क ब्रेक आहे. मागच्या चाकाला ड्रम ब्रेकचं प्रयोजन आहे. ब्रेकिंग परफॉर्मंससाठी यात सिंगल चॅनेल एबीएस असेल. सस्पेंशनसाठी बाइकच्या पुढे टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला ड्युअल शॉक्स अब्जॉर्बर असेल.

बुलेटची किंमत किती असेल

नव्या बुलेटची किंमत किती असेल याबाबत खुलासा लाँचिंगवेळी केला जाईल. सध्याच्या मॉडेलपेक्षा नक्कीच याची किंमत जास्त असेल. भारतात 2022 बुलेट 350 ची किंमत 1.51 लाख रुपये (एक्स शोरुम) ने सुरु होते.

रॉयल एनफिल्डचं अपकमिंग मॉडेल हार्ले डेविडसनच्या मेड इन इंडिया बाइकशी स्पर्धा करेल. हार्ले बाइक लवकरच हीरो मोटोकॉर्पसोबत भागीदारी करणार असून लवकरच आपली नवी कोरी बाइक लाँच करणआर आहे. त्यामुळे बाइकप्रेमींना चांगले पर्याय उपलब्ध होणार आहेत.

लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती.
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे
Toolkit दहशतवाद्यांच्या डेड ड्रॉप पॉलिसीचे 'हे' 4 कोड असतात महत्त्वाचे.
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च
पाक लष्करानंतर नागरिकांमध्ये घाबरगुंडी; Google वर एकच गोष्ट करताय सर्च.
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल
हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल.
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला
बिबट्याने 11 महिन्यांच्या चिमूकल्याला उचलून नेलं, 18 तासांनंतर सापडला.
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्...
'पहलगाम'चा अख्खा प्लानचं उघड, अतिरेक्यांना काय होत्या सूचना? अन्....
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये
'या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..', पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये.
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी
हल्ल्याआधी बैसरन व्हॅलीत मुक्काम,या तीन ठिकाणांची दहशतवाद्यांकडून रेकी.
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.