सिंगल चार्जवर 300 किमी रेंज, ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

सिंगल चार्जवर 300 किमी रेंज, 'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
Tata Tigor EV
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 7:18 PM

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (300 km range on single charge, these are cheapest electric cars in India)

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सची विक्री सुरु केली आहे. त्यापैकी काही गाड्यांना ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. यामध्ये टाटा मोटर्स कंपनी आघाडीवर आहे. चला तर मग जाणून घेऊयात देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्यांबाबत…

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक (TATA NEXON EV)

भारतीय बाजारात सध्या टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला सर्वाधिक मागणी आहे. कंपनीने ऑगस्ट 2021 मध्ये नेक्सॉन EV च्या एकूण 1022 युनिट्सची विक्री केली आहे. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार XM, XZ+ आणि XZ + LUX अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सॉन ईव्हीच्या XM व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे, तर XZ+ आणि XZ+ LUX व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 15.25 लाख आणि 16.25 लाख रुपये आहे.

या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये दिलेलं इलेक्ट्रिक मोटर इंजिन 129PS पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरने 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तास लागतात, तर फास्ट चार्जरने नेक्सॉनची बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्च करण्यासाठी 60 मिनिटे पुरेशी आहेत. या कारला 8 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देण्यात आली आहे, तसेच यामध्ये IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे.

एमजी झेडएस ईव्ही (MG ZS EV)

MG ZS EV या इलेक्ट्रिक कारला देशात चांगली मागणी आहे. या कारची किंमत 20.88 लाख ते 23.58 लाख रुपयांदरम्यान आहे. या कारमध्ये 44.5 kWh क्षमतेची हायटेक बॅटरी देण्यात आली आहे, जी 400 किमीपर्यंतची रेंज देते. एमजी मोटर्स कंपनीने म्हटलं आहे की, ही बॅटरी प्रत्येक ऋतूमध्ये, वेगवेगळ्या तापमानांमध्ये तपासून पाहिली आहे. कंपनीला विश्वास आहे की, ही कार 300 ते 400 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. परंतु ही गोष्ट तुम्ही ती कार कुठे आणि कशी चालवताय? यावर अवलंबून आहे. या बॅटरीसह ही कार 8.5 सेकंदांमध्ये 100 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते आणि 143 PS देते.

एमजी कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांनी चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर एक्सपँड करणं सुरु ठेवलं आहे. तसेच प्रत्येक ZS EV युनिटसह ग्राहकांना वॉल चार्जिंग युनिट दिलं जाणार आहे. कंपनी या बॅटरी पॅकवर 8 वर्षांची वॉरंटी देत आहे. सोबतच कंपनीने 5 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी किंवा 1.50 लाख किलोमीटरची ऑफर दिली आहे. यासह कंपनीने पाच मोफत लेबर सर्विस, 5 रोड साइड असिस्टन्स आणि 5 वें चार्जिंगची सुविधा दिली आहे. कंपनी भारतातील 31 शहरांमध्ये त्यांच्या EV वाढवण्याची तयारी करत आहे.

ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

टाटा टिगॉर (TATA TIGOR)

टाटाची आणखी एक इलेक्ट्रिक कार देशात ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. गेल्या महिन्यात TATA Motors ने नवीन इलेक्ट्रिक Tigor EV लाँच केली. ही कार सिंगल चार्जवर 250 किमीपर्यंतची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. Tigor EV ची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कार 0-60 मिनिटात 80 टक्के चार्ज होऊ शकते. कारच्या बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.

ह्युंडई कोना ईव्ही (HYUNDAI KONA)

ह्युंडई कोना ईव्हीनेदेखील देशात चांगला जम बसवला आहे. ह्युंडई कोनाची किंमत 23.75 लाख ते 23.94 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. Kona ईव्हीमध्ये 39.3 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅचरी 136 hp ची पॉवर देते. सिंगल चार्जवर ही कार 452 किमीपर्यंत धावू शकते. कोना कार 9.7 सेकंदात 100 किमीपर्यंतचा वेग धारण करु शकते. या कारचं टॉप स्पीड 165 किमी प्रतितास इतकं आहे.

महिंद्रा ई-व्हेरिटो (Mahindra E Verito)

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये महिंद्राची एक कार उपस्थित आहे, तसेच कंपनी लवकरच दोन नव्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 9.13 लाख ते 11.6 लाख रुपयांदरम्यान आहे. सिंगल चार्जवर ही कार 181 किलोमीटरपर्यंत धावते. या कारमध्ये 21.2 kWh लिथियम ऑयन बॅटरी देण्यात आली आहे.

इतर बातम्या

महिंद्राच्या शानदार SUV वर 2.63 लाखांचा डिस्काऊंट, ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(300 km range on single charge, these are cheapest electric cars in India)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.