31 टक्के लोकांना या चुकीमुळे मिळत नाही ड्रायव्हिंग लायसन्स, चाचणीदरम्यान हे लक्षात ठेवा

अलीकडेच सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नवीन नियम लागू केलेत, त्यानंतर सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या राज्यांमध्ये आरटीओची संख्या वाढवत आहे. दुसरीकडे परवाना मिळविण्यासाठी चाचणीमध्ये आणखी अनेक मापदंड जोडत आहे.

31 टक्के लोकांना या चुकीमुळे मिळत नाही ड्रायव्हिंग लायसन्स, चाचणीदरम्यान हे लक्षात ठेवा
Driving Licence
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 7:06 AM

नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसन्स बनवताना RTO मध्ये वाहन चालवतानाची परीक्षा द्यावी लागते. तीसुद्धा RTO च्या मापदंडांसह परीक्षा द्यावी लागते. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. त्याचबरोबर अलीकडेच सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नवीन नियम लागू केलेत, त्यानंतर सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या राज्यांमध्ये आरटीओची संख्या वाढवत आहे. दुसरीकडे परवाना मिळविण्यासाठी चाचणीमध्ये आणखी अनेक मापदंड जोडत आहे.

परंतु ते एक चूक करून बसतात

बरेच लोक चाचणीसाठी वाहन चालवताना सर्व खबरदारी घेतात, परंतु एक चूक करून बसतात, ज्यामुळे ते परीक्षेत अयशस्वी होतात आणि त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स बनत नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या एका अहवालात हे उघड झालेय. तर ती चूक काय आणि ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जाणून घेऊया…

म्हणून त्यांना अपयश येते

ड्रायव्हिंग लायसन्सच्या चाचणी अहवालातील अपयशाचे मुख्य कारण शोधण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरातील आरटीओमध्ये चाचपणी केली. तेव्हा 31 टक्के वाहने असल्याची माहिती समोर आली, चारचाकींच्या चाचणीदरम्यान बरेच जण गाडी रिव्हर्स घेताना चूक करतात. म्हणजेच समोरून वाहन चालवताना ते बरोबर वाहन उजवीकडे आणि डावीकडे वळवतात, पण जेव्हा रिव्हर्स घ्यायची वेळ येते तेव्हा ते त्यात चूक करतात आणि असे करणाऱ्यांची टक्केवारी 31 आहे.

नवीन नियम कसे असतील

काही दिवसांपूर्वीच नवीन नियम आणि उत्तीर्णतेच्या टक्केवारीवर सभागृहात लेखी उत्तराद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराकडे कमीत कमी 69 टक्के गुण असणे आवश्यक आहे, तरच तो पुढील परीक्षेसाठी पात्र होईल. यासह अर्जदाराकडे काही विशेष कौशल्ये असणे आवश्यक आहे, जसे की वाहन उजवीकडे-डावीकडे किंवा रिव्हर्स करणे आणि मर्यादित अंतराने उजवीकडे चालवणे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले.

ही एक नवीन चाचणी असेल

परीक्षा देण्यासाठी नियुक्तीदरम्यान अर्जदाराला फक्त एक व्हिडिओ लिंक प्रदान केली जाईल, ज्यात ड्रायव्हिंग टेस्टची संपूर्ण माहिती असेल. याशिवाय ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकवर एलईडी स्क्रीनद्वारे चाचणीचा डेमो अर्जदाराला दाखवला जाईल.

संबंधित बातम्या

‘या’ शेअरची किंमत 99 वरून 309 रुपयांपर्यंत पोहोचली, 1 वर्षात 200% पेक्षा जास्त परतावा

EPFO च्या वेबसाईटवर वारंवार पासवर्ड टाकण्याची झंझट दूर; ‘या’ अॅपवर एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

31% of people do not get a driving license because of this mistake, keep this in mind during the test

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.