New KTM RC390, Bajaj Pulsar 250, दिवाळीच्या मुहूर्तावर 4 नव्या दुचाकी लाँचिंगसाठी सज्ज, पाहा पूर्ण लिस्ट
आम्ही अशा काही बाईक्स आणि स्कूटरची यादी येथे घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्ही नव्या बाईक्स किंवा स्कूटर खरेदीचा विचार करीत असाल तर ही यादी तुम्हाला उपयुक्त ठरेल.

मुंबई : सणांचा हंगाम आता सुरु होणार आहे. दसरा-दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दुसऱ्या बाजूला कोरोना महामारीचा प्रभावही कमी झाला आहे. मार्केटमध्ये पुन्हा हळूहळू उत्साह संचारत असल्याचे चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या सणासुदीच्या दिवसांत अनेक वाहन उत्पादक कंपन्या नवीन वाहने लाँच करण्यास तयार आहेत. देशात येत्या सणासुदीच्या काळात काही नवीन बाईक आणि स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध होतील, तर काही कंपन्या आपले नवीन मॉडेल लवकरच सादर करतील. आज आम्ही अशा काही बाईक्स आणि स्कूटरची यादी येथे घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्ही नव्या बाईक्स किंवा स्कूटर खरेदीचा विचार करीत असाल तर ही यादी तुम्हाला उपयुक्त ठरेल. (4 new bike-scooters ready to launch in India on Diwali, check full list)
या यादीमध्ये बजाज, केटीएम, टीव्हीएस आणि अगदी बीएमडब्ल्यू कंपनीच्या टू व्हीलर्सचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांत नवीन गाड्या कमी प्रमाणात लाँच झाल्या. त्यामुळे ग्राहकांना चांगले पर्याय मिळू शकले नाहीत. परंतु आता काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही तुमची आवडती बाईक या यादीतून निवडून येत्या सणासुदीच्या काळात ती घरी आणू शकता.
Bajaj Pulsar 250
बजाज ऑटो या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन पल्सर 250 मोटरसायकल लाँच करणार असल्याची शक्यता आहे. भारतात लॉन्च होणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी डिस्प्लेसमेंट पल्सर असेल. यात 250 सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन मिळण्याची अफवा आहे. भारतात मोटारसायकल चाचणीसाठी आधीच तयार केली गेली आहे.
New Generation KTM RC390
पल्सर बाईक्सच्या नवीन रेंज व्यतिरिक्त बजाज ऑटो भारतातील KTM RC श्रेणीच्या नव्या जनरेशनला हिरवा कंदील दाखवेल. याची सुरुवात RC390 पासून होईल. RC390 नोव्हेंबरमध्ये भारतात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.
TVS Jupiter 125
नवीन रेडर 125 नंतर टीव्हीएस मोटर कंपनी नव्या ज्युपिटर 125 दुचाकी विभागात 125 सीसी स्कूटरसह आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. ही स्कुटर 7 ऑक्टोबर रोजी भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. ही हीरो मेस्ट्रो एज 125 आणि होंडा ऍक्टिव्हा 125 यासह भारतातील अन्य 125 सीसी स्कूटरचा थेट स्पर्धा करणार आहे.
BMW 400 GT
BMW Motorrad India ने याआधी अनेकदा नवीन 400 GT स्कूटरला टीज केले आहे. BMW च्या नवीन ऑफरसाठी प्री-लॉन्च बुकिंग भारतातील निवडक BMW Motorrad डीलरशिपवर देखील सुरू झाली आहे. इच्छुक ग्राहक 1 लाखांच्या टोकन रकमेसाठी ही स्कूटर बुक करू शकतात. ही आधीच काही आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. लॉन्च झाल्यावर या स्कूटरची किंमत सुमारे 4 लाख रुपये (एक्स-शोरूम) अपेक्षित आहे.
इतर बातम्या
Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?
महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात
(4 new bike-scooters ready to launch in India on Diwali, check full list)