5 सीटर कारमध्ये 5 पेक्षा जास्त लोक बसवू नका, ‘हे’ तोटे होतील, जाणून घ्या
5 seater car capacity: 5 सीटर कारमध्ये 5 पेक्षा जास्त लोक बसले तर यामुळे प्रवाशांची सुरक्षितता तर धोक्यात येतेच, शिवाय ती कायद्याच्या देखील विरोधातली आहे. ही सवय बदलण्यासाठी तुम्हाला त्याचे तोटे माहित असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया.

5 Seater Car Capacity: 5 सीटर कारमध्ये 5 पेक्षा जास्त लोक बसणे ही अतिशय धोकादायक सवय आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता तर धोक्यात येतेच, शिवाय ते कायद्याच्या देखील विरोधात आहे. ही सवय बदलण्यासाठी तुम्हाला त्याचे तोटे माहित असणे गरजेचे आहे.
सुरक्षा: कारसीट आणि सुरक्षा उपकरणे विशिष्ट संख्येने प्रवाशांना सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. यापेक्षा जास्त लोक बसले तर अपघात झाल्यास सर्व प्रवाशांना सुरक्षित ठेवणे अवघड होऊन बसते.
अपघाताचा धोका: जास्त लोक बसल्याने गाडीचे वजन वाढते, ज्याचा ब्रेकिंग आणि हाताळणीवर परिणाम होतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
कारमध्ये 5 पेक्षा जास्त लोक बसणे कायद्याच्या विरोधात
कायद्याचे उल्लंघन: बहुतांश देशांमध्ये 5 सीटर कारमध्ये 5 पेक्षा जास्त लोक बसणे कायद्याच्या विरोधात आहे. जर तुम्ही पकडले गेले तर तुम्हाला दंड किंवा इतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
इन्शुरन्स क्लेम: जर एखादा अपघात झाला आणि तुमच्याकडे 5 पेक्षा जास्त लोक बसले असतील तर तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम देण्यास नकार देऊ शकते.
‘हे’ देखील जाणून घ्या
HSRP बसवण्यासाठी किती खर्च येईल?
नवीन वाहनांची बुकिंग केल्यानंतर 90 दिवसांच्या आत त्यांना ही नंबर प्लेट लावावी लागेल. प्रवासी वाहनांसाठी 745 रुपये, तीनचाकी वाहनांसाठी 500 रुपये, दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.
HSRP कुठे आणि कोण लावणार?
वाहनाच्या आरटीओ कार्यालयानुसार एचएसआरपीची तरतूद करण्याचे काम तीन एजन्सींना देण्यात आले आहे. ते आधी अधिकृत वाहन पोर्टल वापरून वाहन तपशीलांची पडताळणी करतील. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) खूप महत्त्वाची आहे.
HSRP च्या नंबर प्लेट विशेष प्रकारच्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात. या नंबर प्लेटवर परावर्तित रंग आहेत जे प्रकाशात सहज दिसतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सहज कॅप्चर होतात. या नंबर प्लेट्स युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रदर्शित करतात.
वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहन यांच्यातील फरक
HSRP चा रंग आणि फॉन्ट वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहन यांच्यातील फरक जाणून घेण्यासाठी डिझाइन केले आहे. पांढरा, पिवळा आणि हिरव्या रंगात ही प्लेट तयार केली जाते. या क्रमांकांवर “इंडिया” असे देखील मुद्रित असते. याशिवाय निळ्या रंगात अशोक चक्र असते.