7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

Jeep Compass बेस्ड 7-सीटर SUV यावर्षी 26 ऑगस्टपर्यंत अनुक्रमे भारतीय आणि ब्राझीलच्या बाजारात मेरिडियन आणि कमांडर नेमप्लेट्ससह जागतिक पदार्पण करण्याची शक्यता आहे.

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 8:34 AM

मुंबई : Jeep Compass बेस्ड 7-सीटर SUV यावर्षी 26 ऑगस्टपर्यंत अनुक्रमे भारतीय आणि ब्राझीलच्या बाजारात मेरिडियन आणि कमांडर नेमप्लेट्ससह जागतिक पदार्पण करण्याची शक्यता आहे. जीप 7-सीटर SUV विकसित करत आहे. ही अमेरिकन कार निर्मात्याची थ्री-रो एसयूव्ही जीप कंपासवर आधारित असेल. याआधी चाचणी दरम्यान ही कार बऱ्याचदा पाहायला मिळाली आहे. या कारमध्ये एक हेवी कॅमो देखील आहे. आगामी मॉडेलला भारतीय बाजारात जीप मेरिडियन म्हटले जाण्याची शक्यता आहे. (7 seater Jeep Commander SUV will launched on August 26 in India, check price and features)

ब्राझीलमध्ये या कारला जीप कमांडर असे नाव दिले जाईल, असे अपेक्षित आहे. या मॉडेलचे जागतिक पदार्पण या वर्षी 26 ऑगस्ट रोजी होईल, असे सांगण्यात आले आहे. कम्पासवर आधारित, मेरिडियन/कमांडर वाढीव डायमेंशन्सचा दावा करते. तसेच, कंपासच्या तुलनेत इंटिरिअर्स अधिक रिफाइन केले जातील कारण 7 सीटर एसयूव्ही ब्रँडच्या लाइन-अपमध्ये कंपास आणि मोठ्या ग्रँड चेरोकी दरम्यान फिट होईल. ब्रँडचा एक टीझर आधीच शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 7-सीटर एसयूव्ही-कमांडरच्या नावाचा खुलासा करण्यात आला आहे.

लीक झालेल्या इमेजेस मेरिडियनचं डिझाइन रिव्हील करतात. ही कार ग्रँड चेरोकीच्या स्केल-डाउन आवृत्तीसारखी असेल. ट्रेडिशनल 7-स्लेट ग्रिल समोरच्या बाजूस अधिक आकर्षक दिसेल. एक हाय-सेट बोनेट, रेक्टँग्युलर हेडलॅम्प आणि इतर एसयूव्ही हायलाइट कमांडरला अधिक दमदार बनवतात.

7-सीटर Jeep SUV मध्ये काय असेल खास?

मागील भाग क्रोम रिबनसह लाइट बारसह येऊ शकतो. यात इंटिग्रेटेड रूफ स्पॉयलरही मिळेल. अशी अपेक्षा आहे की 7-सीटर एसयूव्हीमध्ये बरीच वैशिष्ट्ये असतील. 10.1 इंचाची टचस्क्रीन सेंटर कन्सोलवर ठेवली जाईल, जी अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कॉम्पॅटिबिलिटी ऑफर करते.

जीप दोन सीटिंग कॉन्फिगरेशन प्रदान करेल, ज्यात 6-सीटर आणि 7-सीटर लेआउटचा समावेश आहे. ब्राझीलच्या बाजारात, कमांडर 2.0-लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनसह आणि 1.3-लीटर टर्बोफ्लेक्स पेट्रोल मोटरसह विक्रीसाठी सादर केली जाईल. इंडिया स्पेक मॉडेल मेरिडियनवर तत्सम पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

भारतात कधी लाँच होणार

लॉन्च टाइमलाइनबद्दल बोलायचे झाल्यास, जीप मेरिडियन 2022 च्या पहिल्या सहामाहीत भारतीय बाजारात सादर केली जाईल. त्याची प्रारंभिक किंमत अंदाजे 28 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. मेरिडियन भारतीय बाजारात VW Tiguan Allspace आणि Skoda Kodiaq यांच्याशी स्पर्धा करेल. जीप 7 सीटर एसयूव्ही तयार करत आहे.

इतर बातम्या

जीप 2023 मध्ये आणणार आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या यात काय असेल खास

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

(7 seater Jeep Commander SUV will launched on August 26 in India, check price and features)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.