प्रतीक्षा संपली, नवी 7 सीटर Tata Safari 2021 लाँच, किंमत…
टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने त्यांची नवीन टाटा सफारी (Tata Safari 2021) 7 सीटर कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केली आहे.
मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने त्यांची नवीन टाटा सफारी (Tata Safari 2021) 7 सीटर कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केली आहे. Tata Safari 2021 SUV ची सुरुवातीची किंमत 14.69 लाख रुपये (एक्स शो-रूम) इतकी ठेवण्यात आली आहे. या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 21.25 लाख रुपये इतकी आहे. 90 च्या दशकात भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी टाटा सफारी आता अधिक अपग्रेडेड तंत्रज्ञानासह आपल्या भेटीला आली आहे. टाटा मोटर्स कंपनीने काही आठवड्यांपूर्वी ही कार सादर केली होती. तसेच या कारचं बुकिंगदेखील सुरु करण्यात आलं आहे. दरम्यान कंपनीने नवीन टाटा सफारी 6 सीटर आणि 7 सीटर अशा दोन पर्यायांसह लाँच केली आहे. (7 seater Tata Safari 2021 launched in India price starts at Rs 14.69 lakh)
2021 टाटा सफारी एसयूव्ही ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करते. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.
अशी आहे All New Tata Safari 2021
नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते. दरम्यान कंपनीने या कारमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार या वर्षातली सर्वात बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.
LED DRLs सह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स
टाटा सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिले जातील. यासोबत तुम्हाला LED डेटाईम रनिंग लॅम्प्सही दिले जातील, जे इंडिकेटर्सदरम्यान डबल होतील.
चारही टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स
हॅरियरमध्ये केवळ फ्रंट (पुढच्या बाजूचे) टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले होते. परंतु टाटा सफारीच्या प्रत्येक टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळतील. विशेष म्हणजे सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये ही सुविधा दिली जाईल.
रूफ रेल्स
2021 टाटा सफारीमध्ये स्लायलिश रूफ रेल्स देण्यात आले आहेत, जे या गाडीला अधिक प्रिमियल लुक देतात. रुफ रेल्सवर सफारीचं ब्रँडिंग करण्यात आलं आहे.
बॉस मोड
बॉस मोड एक असं बटण आहे ज्याद्वारे मागे बसलेला प्रवासी पुढे बसलेल्या प्रवाशाची सीट पुढे ढकलू शकतो. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशाला स्वतःच्या सोयीने आरामात बसता येतं.
टिल्ट आणि टेलीस्कोपिक स्टियरिंग व्हील
2021 टाटा सफारीमध्ये टिल्ट आणि टेलीस्कोप अॅडज्सटेबल स्टियरिंग व्हील देण्यात आलं आहे, जे प्रत्येक वेरियंटमध्ये मिळेल. यामुळे रायडरला (चालकाला) परफेक्ट रायडिंग पोझिशन मिळते.
रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स
सफारीमध्ये रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स मिळतात ज्या रियर पॅसेंजर्ससाठी खूपच आरामदायक आहेत. लांबच्या प्रवासासाठी जात अताना हे फिचर प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचं आहे.
सेफ्टी टच
2021 टाटा सफारी डुअल फ्रंटल एयरबॅग्ससह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मीटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी आणि ब्रेक डिस्क वायपिंग फिचर्स देण्यात आले आहेत.
ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं मोठी व्हेरियंट आहे. ही कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. तसेच गेल्या आठवड्यात टाटाने फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं 26 जानेवारीला आगमन होत असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्याच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच या गाडीचं बुकिंगही सुरु होणार आहे. टाटा मोटर्सची ही नवी Safari ची इंटेरिअर थीम Oyster White रंगाची आहे. या गाडीत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आलंय. याशिवाय या गाडीचे व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक देण्यात आलाय. टाटा मोटर्सने म्हटलं आहे, “भविष्यात नव्या Safari चं इलेक्ट्रिक व्हर्जनही येऊ शकतं. या गाडीला त्याला साजेसं डिझाईन साकारण्यात आलं आहे.
दमदार इंजिन
या कारच्या इंजिन आणि गियरबॉक्स चा विचार केल्यास या कारमध्ये 2.0 लीटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. याचा वापर हॅरियरमध्ये केला जावू शकतो. हे इंजिन 170 एचपीचे पॉवर जनरेट करते. याशिवाय कारमध्ये सिक्स स्पीड मॅन्यूअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. ही कार 4 व्हील ड्राईव्ह सिस्टम सोबत येते.
The Safari is all set to rule the Indian roads again. Get ready to #ReclaimYourLife. Join us to witness it LIVE. https://t.co/yjquTjTvXV
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) February 22, 2021
नवीन टाटा सफारीमध्ये खास बदल
=>> या एसयूव्हीमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. जसे की, प्रोडक्शन व्हर्जनमध्ये मोठे हनीकॉम्ब पॉटर आणि क्रोम हायलाईटसह एलईडी प्रोजेक्टर लाईट दिली जात आहे. =>> नवीन सफारीच्या इंजिन आणि डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक दमदार फिचर्ससह बनवली जात आहे. =>> या कारमध्ये सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, 3-स्पोक स्टियरिंग व्हील, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रिकग्नायजेशन, 7-इंचांचा इंस्ट्रूमेंट पॅनल, प्रीमियम ओक मिळू शकतो. =>> या कारमध्ये तपकिरी रंगांची लेदर सीट आणि जेबीएलचे स्पीकर्स दिले जातील. =>> 2021 टाटा सफारी एसयूव्ही बीएस 6-कंप्लिट फिएट-सोर्सड 2.0-लीटर, 4-सिलेंडर डिझेल इंजिनद्वारे ऑपरेट होईल, जे 5-सीटर हॅरियर एसयूव्हीला पॉवर देतं. हे इंजिन 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेलं असेल. =>> या गाडीमध्ये तुम्हाला एक्सटिरियर पेंट ऑप्शन आणि नवीन अलॉय व्हील्स मिळू शकतात. =>> नव्या अवतारातील एसयूव्हीमध्ये ग्राहकांना प्रवासाचा जबरदस्त अनुभव मिळेल. या कारचं डिझाईन, परफॉर्मन्स, मल्टी टास्किंग आणि अनेक प्रकारच्या सर्विसेसमुळे ही कार अधिक दमदार बनली आहे.
Join us for the Launch and Price announcement of the All-New Safari on 22nd February, 11AM . . Watch live on:
FB: https://t.co/wP1xwkQQ8t YT: https://t.co/CEydyEjUdH IG: https://t.co/5FCPXKXzOp TW: https://t.co/P1RWb50z3n Know More: https://t.co/I30erRooA4 pic.twitter.com/7atvAGBvsh
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) February 20, 2021
हेही वाचा
Tata Safari साठी बुकिंग सुरु, जाणून घ्या किती पैसै देऊन गाडी बुक करता येईल
टाटाच्या नव्या Safari चा फर्स्ट लूक, काय आहेत फीचर्स?
पॉवरफुल एसयूव्ही Mahindra XUV 500 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(7 seater Tata Safari 2021 launched in India price starts at Rs 14.69 lakh)