मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकार 8 प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग (Airbags in Vehicle) असणे बंधनकारक करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी काही ट्विट्स करुन सांगितले की, वाहन उत्पादकांना प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वाहनांमध्ये एअरबॅगची संख्या वाढवावी लागेल. त्यांना आठ प्रवासी क्षमतेच्या वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग्ज बसवण्यास सांगितले जाईल. गडकरींच्या म्हणण्यानुसार, आठ प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या अधिसूचनेला त्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. नवा नियम ऑक्टोबरपर्यंत लागू होईल, असे मानले जात आहे.
गडकरी म्हणाले की, दोन वाहनांमध्ये समोरासमोर होणारी धडक आणि बाजुने होणारी धडक याचा परिणाम कमी करून प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनांमध्ये इतर चार एअरबॅग्जही पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील सीटमध्ये दोन बाजूच्या एअरबॅग्ज आणि दोन ट्यूब एअरबॅग्ज दिल्याने सर्व प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल.
भारतात मोटार वाहनांना अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. गडकरी म्हणाले की, एअरबॅगची संख्या वाढवण्याच्या हालचालीमुळे सर्व प्रकारच्या वाहनांची आणि सर्व किमतीच्या श्रेणीतील वाहने यांच्या सुरक्षेची खात्री करून घेता येतील.
In order to enhance the safety of the occupants in motor vehicles carrying upto 8 passengers, I have now approved a Draft GSR Notification to make a minimum of 6 Airbags compulsory. #RoadSafety #SadakSurakshaJeevanRaksha
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 14, 2022
सरकारी आकडेवारीनुसार 2020 मध्ये राष्ट्रीय महामार्गांवर एकूण 1.16 लाख रस्ते अपघात झाले ज्यात 47,984 लोकांचा मृत्यू झाला. गडकरींनी गेल्या वर्षी सांगितले होते की, लहान मोटारी, ज्यांना प्रामुख्याने कनिष्ठ मध्यमवर्गाची पसंती असते, त्यांचा अपघात झाल्यास त्यात बसलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी योग्य एअरबॅग्ज असायला हव्यात. ते म्हणाले होते की केवळ महागड्या मोठ्या कारमध्येच कार उत्पादक आठ एअरबॅग देतात.
To minimise the impact of frontal and lateral collisions to the occupants seated in both front and rear compartments, it has been decided that 4 additional airbags be mandated in the M1 vehicle category,…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 14, 2022
गडकरी म्हणाले होते की, छोट्या गाड्या बहुतांशी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबे खरेदी करतात पण त्यात पुरेशा एअरबॅग नसल्यामुळे अपघातात मृत्यूची शक्यता वाढते. तथापि, अधिक एअरबॅग्जमुळे कारच्या किमती 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकतात, असे गडकरी यांनी सांगितले होते.
This will ultimately ensure the safety of passengers across all segments, irrespective of the cost/variant of the vehicle. #RoadSafety #SadakSurakshaJeevanRaksha
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 14, 2022
इतर बातम्या
या चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग असणं अनिवार्य; गडकरींची महत्त्वाची सुचना
प्रतीक्षा संपली ! सेव्हन सिटर Kia Carens कार भारतात लॉन्च, फक्त 25 हजार रुपये देऊन करा बूक
शानदार ऑफर! Hyundai i10 अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत
(8-seater vehicles to have 6 airbags compulsory, says Nitin Gadkari)