Scorpio-N : पाकिस्तानला लागलं भारतीय कारचं वेड! काय आहे संपूर्ण प्रकार? जाणून घ्या

'पॉपकॉर्न' या यूट्यूब चॅनलवर पाकिस्तानी लोकांच्या स्कॉर्पिओ एन कारबद्दलच्या क्रेझचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये लोक या कारचे चांगलेच कौतुक करताना दिसत आहेत.

Scorpio-N : पाकिस्तानला लागलं भारतीय कारचं वेड! काय आहे संपूर्ण प्रकार? जाणून घ्या
Scorpio-NImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 1:42 PM

गेल्या आठवड्यात महिंद्रा & महिंद्राने (Mahindra & Mahindra) आपली नवीन व्हेरिएंटची स्कॉर्पिओ एन (Scorpio-N) लाँच केली. ही कार बाजारात दाखल होणार त्याआधीपासूनच तिची भारतात मोठी चर्चा होती. कारचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, लूक आदींबाबत भारतीय लोकांमध्ये अत्यंत उत्सूकता बघायला मिळत होती. कारच्या टीझरनंतर कारची संपूर्ण माहिती लिक झाली. लोक खरेदीसाठी या कारची आतुरतेने वाट बघत आहेत. या कारची चर्चा केवळ भारतातच नाही तर शेजारील देश पाकिस्तानमध्येही जोरात सुरू आहे. नवीन लुक आणि फीचर्ससह सादर करण्यात आलेल्या या कारची भारतीयांसोबतच पाकिस्तानमधील लोकांमध्येही (Pakistanis) मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

लोकांनी दिल्या धक्कादायक प्रतिक्रिया

पाकिस्तानमध्ये महिंद्राच्या स्कॉर्पिओ एनबद्दल लोकांमध्ये किती क्रेझ आहे, याचे एक ताजे उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानातील लोकांच्या प्रतिक्रियांवरून त्यांना या नवीन कारने अक्षरश: वेड लावल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. हे पाहता महिंद्राची ही नवी कार आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पब्लिक रिअॅक्शन यूट्यूब चॅनल ‘पॉपकॉर्न’वर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये नवीन स्कॉर्पिओ एनबद्दल पाकिस्तानी लोकांची प्रतिक्रिया थक्क करणारी आहे. या गाडीच्या फीचर्स आणि डिझाइनची प्रशंसा केली जात आहे. यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लोक महिंद्राच्या स्कॉर्पिओ एन एसयूव्हीचे नवीन व्हेरिएंटला पाहून त्याकडे आकर्षिंत झाल्याचे दिसत आहे. लूकची मोठ्या प्रमाणात प्रशंसा करताना दिसतात. काही लोक तिची तुलना टोयोटाच्या फॉर्च्युनरशी करत आहेत. स्कॉर्पिओच्या किमतीची चर्चाही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

किंमतीबद्दल व्हिडिओत चर्चा

व्हायरल व्हिडिओमध्ये या कारच्या किमतीबाबत पाकिस्तानी लोकांमध्ये चर्चा दिसून येत आहे. यामध्ये त्याची किंमत 80 लाखांपासून ते एक कोटी पाकिस्तानी रुपयांपर्यंत सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये भारतात त्याची किंमत 14 लाख ते 48 लाखांपर्यंत दाखवली जात आहे. वास्तविक, भारताचा एक रुपया पाकिस्तानी 2.59 रुपयाच्या बरोबरीचा आहे. कारची भारतात किंमत 11.99 लाख रुपयांपासून 19.49 लाख रुपयांपर्यंत आहे.

स्कॉर्पिओ-एन पाच ट्रिममध्ये उपलब्ध

या कारच्या बेस मॉडेलची पाकिस्तानमध्ये सध्या किंमत 31 लाख पाकिस्तानी रुपये आहे. नवीन Scorpio-N बद्दल बोलायचे झाले तर ते Z2 ते Z8 L पर्यंत पाच ट्रिममध्ये उपलब्ध असेल. त्याची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 19.49 लाख रुपये आहे.

उद्यापासून टेस्ट ड्राइव्ह सुरू

नवीन स्कॉर्पिओचे बुकिंग 30 जुलै २०२२ पासून सुरू होईल. या कारचे ऑनलाइन बुकिंगही करता येते. 5 जुलैपासून महिंद्राने भारतातील 30 शहरांमधील शोरूममध्ये टेस्ट ड्राइव्हसाठी नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे. नवीन स्कॉर्पिओ-एन सध्याच्या स्कॉर्पिओसोबत विकली जाणार आहे. नवीन एसयूव्हीला आधुनिक डिझाइन देण्यात आली असून सध्याच्या मॉडेलपेक्षा ती मोठी दिसत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.