New Car : नवीन कार खरेदी करताय? ‘या’ दहा गोष्टी तुम्हाला माहितीच हव्यात…

कारची खरेदी केल्यावर ग्राहकांना तिच्या इंटीरियरपासून एक्सटीरियरपर्यंत लहान मोठी माहिती असणे आवश्‍यक असते.

New Car : नवीन कार खरेदी करताय? ‘या’ दहा गोष्टी तुम्हाला माहितीच हव्यात...
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: Indianautosblog
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 1:35 PM

मुंबई : नवीन कार (New Car) खरेदी केल्यानंतर त्याच्या मेंटेनेंसकडे (Maintenance) लक्ष देणे महत्वाचे असते. गाडी सुरुवातीपासून मेंटेन ठेवल्यास गाडीचा परफॉर्मेंस तर वाढतोच शिवाय युजर्सच्या सेफ्टीसाठीदेखील ते आवश्‍यक ठरत असते. आपल्यातील अनेक लोकांना गाडी खरेदी केल्यावर तिचा कशा प्रकारे मेंटेनेंस ठेवायचा याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे नवीन गाडी घेउनही काही वर्षांनंतर गाडीच्या मायलेजसह (Mileage) इतर तक्रारी सुरु होत असतात. कारची योग्य निगा न राखल्याने अनेक समस्या निर्माण होत असतात. कार चांगली मेंटेन ठेवल्यास ती दीर्घ काळापर्यंत उत्तम मायलेज देते. नवीन कारची खरेदी केल्यावर तिची देखभाल कशी राखावी याबाबत काही महत्वाच्या मुद्यांवर या लेखातून चर्चा करणार आहोत.

  1. नवीन कार खरेदी केल्यावर ग्राहकांनी मॅन्यूअलमध्ये कारच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सशी संबंधित माहिती मिळवणे गरजेचे आहे. याला वाचून गाडीसंदर्भात अनेक गोष्टींची माहिती मिळू शकते. ग्राहक स्वत: लहान मोठे रिपेअरिंगदेखील करु शकतात.
  2. गाडी ही पूर्णपणे टायरवर चालत असते. त्यामुळे टायरला काही अडचणी आल्या तर हे लक्षात ठेवले पाहिजे की गाडी रस्त्यावरच अडकून पडेल. त्यामुळे टायर प्रेशरची तपासणी करुन घ्यावी.
  3. कारच्या डॅशबोर्डवर अनेक वॉर्निंग लाइट असतात. कारच्या आत अनेक सेंसर लागलेले असतात. कारमध्ये इंधन कमी असल्यावर कारमधील लाइट त्वरित सिग्नल देतात. त्यामुळे वॉर्निंग लाइटबाबत माहिती ठेवावी.
  4. कारच्या इंधनमध्ये काही अडचणी असल्यास गाडी नीट चालणार नाही. कारच्या इंजिनच्या दुरुस्तीला मोठा खर्च लागत असतो. यासाठी कारमध्ये स्वच्छ इंधन भरण्याला प्राधान्य दिले पाहिजे. वेळोवेळी इंजिनची सफाई करणे आवश्‍यक आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. कारमधील बॅटरीची लाइफ मर्यादीत असते. परंतु बॅटरीची व्यवस्थित देखभाल केल्यास बॅटरीची लाईफ वाढविता येणे शक्य असते.
  7. कारच्या ब्रेकचे कार्य सुधारण्यासाठी ब्रेक फ्लूइडची गरज असते. याची कमतरता असल्यास ब्रेक काम करत नाही. यासाठी ब्रेक फ्लूइड लेव्हल तपासून घेणे गरजेचे असते.
  8. आपली कार म्हणजे एक प्रकारे मशिन आहे. मशिनला योग्य पध्दतीने काम करता यावे यासाठी लुब्रिंकेंट्‌सची आवश्‍यकता असते. यासाठी कारमध्ये आइल बदलण्यासोबत आइल फिल्टरदेखील बदलने गरजेचे असते.
  9. कारचे इंजिन स्टार्ट करण्यामध्ये स्पार्क प्लगची महत्वाची भूमिका अअसते. एक प्रयत्नात इंजिन सुरु न होणे, एक्सलेरेशन वर-खाली होणे किंवा मायलेस कमी होणे हे प्लग खराब होण्याचे लक्षण आहे.
  10. कारची योग्य देखभाल दुरुस्ती उत्तम मायलेजसाठी आवश्‍यक असते. खराब ड्रायव्हिंग किंवा कारवर जास्त ओझ लादल्यामुळे याचा मायलेजवर परिणाम होत असतो.
  11. कारमध्ये चांगली हवा खेळती राहण्यासाठी केबिन फिल्टर वेळोवेळी बदलने आवश्‍यक असते. त्यामुळे तुमची कार कूल राहण्यास मदत होत असते. कारमधील एसीचे नीट काम न करणे केबिनच्या एअर फिल्टरच्या खराब असण्यास होउ शकते.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.