Mahindra XUV700 चे सर्व व्हेरिएंट्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
महिंद्राने (Mahindra) भारतीय बाजारात अधिकृतपणे ऑल न्यू XUV700 लाँच केली आहे. ऑल न्यू Mahindra XUV700 AX आणि MX अशा दोन ग्रुप्समध्ये उपलब्ध आहे. MX सिरीज 11.99 लाख रुपयांपासून तर AdrenoX सिरीज 15.59 लाख रुपयांपासून सुरू होते.
मुंबई : महिंद्राने (Mahindra) भारतीय बाजारात अधिकृतपणे ऑल न्यू XUV700 लाँच केली आहे. कार निर्मात्या कंपनीने ऑगस्टमध्ये ऑल न्यू XUV700 ची किंमत जाहीर केली होती. मात्र, सर्व व्हेरिएंटच्या किंमती जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र आता महिंद्राने XUV700 च्या सर्व व्हेरिएंटच्या किंमती जाहीर केल्या आहेत. ऑल न्यू Mahindra XUV700 AX आणि MX अशा दोन ग्रुप्समध्ये उपलब्ध आहे. MX सिरीज 11.99 लाख रुपयांपासून तर AdrenoX सिरीज 15.59 लाख रुपयांपासून सुरू होते. (All variants of Mahindra XUV700 launched in India, check prices and features)
सर्वात महाग व्हेरिएंट असलेली AX7 (7-सीटर) देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा कंपनीला विश्वास आहे, या कारची किंमत 19.79 लाख रुपये आहे. महिंद्रा 1.8 लाख रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर AX7 ऑटोमॅटिकसह लक्झरी पॅक ऑफर करेल. AX7 डिझेल ऑटोमॅटिकसह AWD व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 1.3 लाख रुपये अधिक असेल.
फीचर्स
XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.
एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते. XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.
सेफ्टी फीचर्स
XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.
इंजिन
XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.
इतर बातम्या
Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?
महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात
(All variants of Mahindra XUV700 launched in India, check prices and features)