Hindustan Motors : लवकरच अ‍ॅम्बेसेडरची दुचारी येणार, प्रसिद्ध ब्रँडच्या इलेक्ट्रिक दुचाकीविषयी जाणून घ्या…

विशेष म्हणजे अ‍ॅम्बेसेडरची दुचाकी येणार असल्यानं रोजगारही मिळणार आहे. बोस म्हणाले की, हिंदुस्थान मोटर्स आता नफा कमवत आहे आणि पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे. सध्या यामध्ये सुमारे तीनशे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, गरज भासल्यास आणखी कर्मचाऱ्यांची नवीन प्रकल्पासाठी निवड करण्यात येणार आहे.'

Hindustan Motors : लवकरच अ‍ॅम्बेसेडरची दुचारी येणार, प्रसिद्ध ब्रँडच्या इलेक्ट्रिक दुचाकीविषयी जाणून घ्या...
अ‍ॅम्बेसेडरची लवकरच दुचाकीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 6:56 AM

मुंबई : क्या जमाना था, असं अनेकदा कोणतंही उदाहरण देताना म्हटलं जातं. घरातील ज्येष्ठ मंडळी, जुने-जाणतेही असा उल्लेख आठवणी सांगताना करताना दिसतात. तोच जामाना आता पुन्हा येणार आहे. हा जमाना अ‍ॅम्बेसेडरचा असणार नाहे. तुम्ही म्हणाल जी अ‍ॅम्बेसेडर कधीकाळीच बंद झाली. तिचा जमाना कसा? हेच आम्ही सांगतोय की आता पुन्हा अ‍ॅम्बेसेडरचा जमाना येणार आहे. अ‍ॅम्बेसेडर कार (Ambassador Car) नव्हे तर अ‍ॅम्बेसेडर बाईकचा. अ‍ॅम्बेसेडर कार निर्माता कंपनी हिंदुस्तान मोटर्स (Hindustan Motors) आता लवकरच इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric Two Wheeler) लाँच करण्याच्या तयारीत आहे. हिंदुस्तान मोटर्स पुढील वर्षी युरोपीय भागीदारीसह इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात आणू शकते. यानंतर कंपनी इलेक्ट्रिक फोर व्हीलर बनवण्याचाही विचार करू शकते.

कधी टू-व्हीलर लाँच होणार?

हिंदुस्थान मोटर्सचे संचालक उत्तम बोस म्हणाले की, दोन्ही कंपन्यांची आर्थिक पडताळणी जुलैमध्ये सुरू होईल. यासाठी दोन महिने लागतील. त्यानंतर तांत्रिक बाबी एकत्रितपणे पाहिल्या जातील. यासाठी देखील थोडा वेळ लागेल. गुंतवणुकीची रचना आणि नवीन कंपनीची निर्मिती ही 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे, असं बोस यावेळी म्हणालेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, नवीन युनिटच्या निर्मितीनंतर प्रकल्पासाठी आणखी सहा महिने लागू शकतात. हे सर्व पाहता पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस इलेक्ट्रिक टू-व्हीलर लाँच होण्याची शक्यता आहे.

ईव्ही लाँच होणार

दुचाकी प्रकल्पाच्या दोन वर्षांनंतर बाजारपेठेतील परिस्थिती पाहून चारचाकी ईव्हीच्या निर्मितीबाबत निर्णय घेतला जाईल, असं कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं सांगितलंय. ते म्हणाले की हिंदुस्थान मोटर (HM) ही देशातील एकमेव मूळ उपकरणे उत्पादक (OM) आहे. ज्याचे स्वतःचे फोर्जिंग, फाउंड्री आणि पेंटचे दुकान तसेच उत्तरपारा येथे असेंबली आणि वेल्डिंगचे दुकान होते. तथापि, कंपनीने अ‍ॅम्बेसेडर कारच्या मागणीअभावी 2014 मध्ये प्लांट बंद केला आणि नंतर 80 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी फ्रेंच ऑटो निर्माता प्यूजिओला आपला आयकॉनिक ब्रँड विकला. बंगाल सरकारनं एचएमला उत्तरपारा प्लांटमधील सुमारे 314 एकर जमीन पर्यायी वापरासाठी विकण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर ती रिअल इस्टेट डेव्हलपरला विकली गेली.

हे सुद्धा वाचा

400 लोकांना नोकऱ्या

विशेष म्हणजे अ‍ॅम्बेसेडरची दुचाकी येणार असल्यानं रोजगारही मिळणार आहे. बोस म्हणाले की, हिंदुस्थान मोटर्स आता नफा कमवत आहे आणि पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे. सध्या यामध्ये सुमारे तीनशे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, गरज भासल्यास आणखी कर्मचाऱ्यांची नवीन प्रकल्पासाठी निवड करण्यात येणार आहे. व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यावर या प्रकल्पात सुमारे 400 जणांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.