kia sedan car : किआकडून ग्राहकांसाठी अजून एक कार ऑप्शन… जाणून घ्या कधी होणार लाँच

किआ इंडियाने भारतात आपली सुरवात किआ सेल्टोस या मिड साइज एसयुव्ही कारपासून केली होती. या कारची स्पर्धा ह्युंडाई क्रेटासोबत होती. यानंतर यात कंपनीने अनेक अपडेटदेखील दिले होते. 2020 मध्ये कंपनीने सोनेट कारला बाजारात दाखल केले होते.

kia sedan car : किआकडून ग्राहकांसाठी अजून एक कार ऑप्शन... जाणून घ्या कधी होणार लाँच
kia sedan carImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 2:40 PM

मुंबई : किआ (kia) आपल्या सेगमेंटचा भारतात वेगाने विस्तार करीत आहे. सध्या कंपनी भारतात किआ ईव्ही 6 ला (kia ev 6) लाँच करीत असली तरी यानंतर कंपनी भारतात सेडन बॉडी टाइप कार लाँच करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लाँचिंगनंतर या कारची स्पर्धा ह्युंडाई एलांट्रा आणि स्कोडा ऑक्टावियासोबत होणार आहे. किआने भारतात सेल्टोससोबत 2019 आपले आगमन केले होते. किआ इंडियाने भारतात आपली सुरवात किआ सेल्टोस या मिड साइज एसयुव्ही (Mid size SUV) कारसोबत केली होती. या कारची स्पर्धा ह्युंडाई क्रेटासोबत होती. यानंतर यात कंपनीने अनेक अपडेटदेखील दिले होते. 2020 मध्ये कंपनीने सोनेट कारला बाजारात दाखल केले होते. आता या वर्षाच्या सुरुवातीला किआ कॅरेंसला लाँच केले आहे. ही कार एमपीव्ही सेगमेंटमध्ये येते.

भारताबाहेर सेडन कार्सची विक्री

भारताच्या बाहेर किआ फोर्टेला सेडन बॉडी टाइपमध्ये विक्री केले जाते. या कारला कंपनी स्लीक आणि स्पोर्टी सांगते. यात अपडेट डिझाईन देण्यात आली आहे. सोबतच यात पावरफूल इंजिनचा पर्यायही देण्यात आला आहे. यात मॅन्यूअल ट्रांसमिशनचाही पर्याय आहे. लेटेस्ट डिझाईननुसार, कंपनीने न्यू डेटाइम रनिंग लाइट्‌सचा वापर केला आहे. आणि यात एलईडी डेटाइम रनिंग लाइट्‌स देण्यात आले आहे. सोबतच नवीन कार्पोरेट लोगोला समोरच लावण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

किआ फोर्टेचे फीचर्स

किआ सेडन कारमध्ये टाइगर नोज फ्रंट ग्रीलचा वापर करण्यात आला आहे. सोबतच यात बंपरला जुन्या मॉडेलच्या तुलनेत पुन्हा रि-डिझाईन करण्यात आले आहे. यात मोठे इयर इनटेक, ट्रिपल एलईडी फॉग लँप, नवीन व्हील्स, बूटलिड स्पोइलर आदी फीचर्स देण्यात आले आहे. यात अपडेट एलईडी टेल लाइट्‌स देण्यात आला आहे.

इंटीरिअरमध्ये बदल

केबिनबाबत बोलायचे झाल्यास, कारमध्ये 10.25 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. यात 4.2 इंचाचे ड्राइव्हर डिसप्ले देण्यात आला आहे. याचा स्पीड आणि फ्यूअल इंडिकेटर सोबत अनेक गोष्टींमध्ये बदल केलेले आढळतील. तसेच ॲप्पल कार प्ले आणि अँड्राईड ऑटोला वायरलेस सपोर्ट देण्यात आला आहे. यात इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो होल्डचाही पर्याय देण्यात आला आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.