ही SUV घेतल्यावर ‘मला आमदार झाल्यासारखं’ वाटतंय, 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर एसयूव्हींची विक्री वाढणार

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Uttar Pradesh Election Results) जवळपास स्पष्ट झाले आहेत. अनेक नेते पहिल्यांदाच आमदार होतील आणि अनेक आमदार पहिल्यांदाच मंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचतील.

ही SUV घेतल्यावर 'मला आमदार झाल्यासारखं' वाटतंय, 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर एसयूव्हींची विक्री वाढणार
Tata Safari - Toyota Fortuner
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 6:20 PM

मुंबई : उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Uttar Pradesh Election Results) जवळपास स्पष्ट झाले आहेत. अनेक नेते पहिल्यांदाच आमदार होतील आणि अनेक आमदार पहिल्यांदाच मंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचतील. विशेषत: पंजाबमध्ये (Punjab Election) पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर नवे नेते आमदार होऊन विधानसभेत पोहोचणार आहेत. आजच्या युगात विशेषत: युवा नेत्यांमध्ये एसयूव्हीची (SUV Car) प्रचंड क्रेझ आहे. गेल्या काही वर्षांत भारतात एसयूव्हीच्या विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषत: उत्तर भारतातील नेत्यांमध्ये एसयूव्हीची मोठी क्रेझ आहे. उत्तरेकडचे नेते आपली पॉवरफुल इमेज आणि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोठमोठ्या एसयूव्ही घेऊन आपल्या मतदार संघात तसेच राज्यभर फिरणं पसंत करतात. एकेका आमदाराच्या, मंत्र्याच्या ताफ्यात किमान दोन-तीन एसयूव्ही असतातच

सध्या, नेत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय दोन एसयूव्ही आहेत, पहिली टाटा सफारी (Tata Safari) आणि दुसरी टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner). याशिवाय राजकारण्यांमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओचीदेखील (Mahindra Scorpio) क्रेझ आहे. खरे तर, टाटा सफारी आणि टोयोटा फॉर्च्युनरचा लूक राजकारण्यांना खूप आवडतो.

अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत या वाहनांचे बुकिंग झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. कारण 5 राज्यांमधून एकूण 690 आमदार विधानसभेत पोहोचणार आहेत. यापैकी बहुतेक नवीन वाहन खरेदीदार असतील आणि त्यांची पहिली पसंती टाटा सफारी किंवा टोयोटा फॉर्च्युनर असू शकते.

स्वस्त दरात सफारी आणि फॉर्च्युनरचा स्वॅग

दोन्ही वाहनांच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर फॉर्च्युनरची किंमत निश्चितपणे टाटा सफारीपेक्षा जास्त आहे. परंतु टाटा सफारी कमी किमतीत टोयोटा फॉर्च्युनर प्रमाणेच स्वॅग आणि परफॉर्मन्स देऊ शकते. फॉर्च्युनरच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सच्या किमती 31.39 लाख रुपयांपासून सुरू होतात. तर टाटा सफारीची किंमत जवळपास निम्म्या म्हणजे 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

फॉर्च्युनर पॉवरफुल एसयूव्ही आहे

टाटा सफारी 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड क्रिओटेक डीझेल इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 3750rpm वर 167.62bhp पॉवर जनरेट करते. तर 2500rpm वर 350Nm पीक टॉर्क देतं. दुसरीकडे, टोयोटा फॉर्च्युनरमध्ये 2.7-लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 5200rpm वर 163.60bhp पॉवर जनरेट करते, तर 4000rpm वर त्याचा पीक टॉर्क 245Nm आहे. त्याच वेळी, तुम्हाला फॉर्च्युनरमध्ये 4×4 ड्राइव्हचा पर्याय देखील मिळतो. त्यामुळे फॉर्च्युनर ही अधिक पॉवरफुल कार आहे. तसेच सफारीच्या तुलनेत या कारचा लुक खूपच प्रीमियम आहे.

इतर बातम्या

उत्तर प्रदेशाच्या निवडणुका संपल्या; आता पेट्रोल-डिझेल भडकणार; या दिवसांपासून दर वाढणार

होळीनिमित्त Mahindra ची शानदार ऑफर, लोकप्रिय गाड्यांवर 2.5 लाखांपर्यंत डिस्काऊंट, पाहा संपूर्ण यादी

31 किमी मायलेजसह Maruti Dzire CNG बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.