नवीन डिझाईन आणि पॉवरफुल इंजिन, Audi A4 Premium च्या लाँचिंगची घोषणा

ऑडी (Audi) या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज ऑडी ए 4 (Audi A4) चे नवीन व्हेरिएंट ऑडी ए4 प्रीमियमच्या (Audi A4 Premium) लाँचची घोषणा केली आहे.

नवीन डिझाईन आणि पॉवरफुल इंजिन, Audi A4 Premium च्या लाँचिंगची घोषणा
Audi A4 Premium
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 6:30 AM

मुंबई : ऑडी (Audi) या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज ऑडी ए 4 (Audi A4) चे नवीन व्हेरिएंट ऑडी ए4 प्रीमियमच्या (Audi A4 Premium) लाँचची घोषणा केली आहे. ऑडी ए4 च्या पाचव्या जनरेशनमध्ये नवीन डिझाइन व शक्तिशाली 2.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 140 KW पॉवर (190 HP) आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. ऑडी ए4 प्रीमियम ही विद्यमान लाइन अपमधील नवीन व्हेरिएंट आहे, ज्यामध्ये ए4 प्रीमियम प्लस व ए4 टेक्नोलॉजी व्हेरिएंट्सचा समावेश आहे. ऑडी ए4 प्रीमियमची किंमत 39,99,000 रूपये (एक्स शोरुम) इतकी आहे. (Audi A4 Premium Variant Launched in India, Priced at Rs 39.99 lakh)

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लों म्हणाले, “ऑडी ए4 ला जानेवारीमध्ये लाँच केल्यापासून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ही कार ब्रॅण्डसाठी ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च विक्री करणारी ठरली आहे. आज आम्ही 2021 मधील आमच्या ब्रॅण्डचे यश साजरे करण्यासाठी नवीन व्हेरिएंट ‘ऑडी ए4’ प्रीमियम सादर करत आहोत. हा आनंद साजरा करण्याचा क्षण आहे आणि आमच्या ग्राहकांना निवड करण्यासाठी तीन ट्रिम लेव्हल्स देत असण्याचा दुसरा आनंद कोणताच नाही. मला विश्वास आहे की, ही कार वेगाने विकसित होत असलेल्या ऑडी समूहामध्ये अधिक ग्राहकांची भर घालेल.”

ऑडी ए4 प्रीमियम 7.30 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी/तास इतका वेग प्राप्त करू शकते. यात 25.65 सेमी एमएमआय सेंट्रल टचस्क्रीनसह इन्फोटेन्मेंट सिस्टिममध्ये ऑडी साऊंड सिस्टिम, ऑडी स्मार्टफोन इंटरफेस, ऑडी फोनबॉक्स लाइटसह वायरेलस चार्जिंगचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये सिंगल झोन ऑटो एअर कंडिशनिंग, 6 एअरबॅग्ज व सिंगल कलर अॅम्बियंट लायटिंगची सुविधा देण्यात आली आहे.

ऑडी ए4 प्रीमियममधील फीचर्स

  • एलईडी हेडलाइट्ससह सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट्स
  • एलईडी रिअर कॉम्बिनेशन लाइट्स
  • ग्लास सनरूफ
  • ऑडी साऊंड सिस्टिम
  • ऑडी स्मार्टफोन इंटरफेस
  • ऑडी फोनबॉक्स लाइटसह वायरलेस चार्जिंग
  • पार्किंग एड प्लस व रिअर व्ह्यू कॅमेरा
  • ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट
  • सिंगल झोन डिलक्स ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग
  • 25.65 सेमी सेंट्रल एमएआय टचस्क्रीन
  • ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टिमसह कलर डिस्प्ले
  • अॅम्बियंट लायटिंग – सिंगल कलर
  • 6 एअरबॅग्ज
  • इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्स
  • इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल, ऑटो फोल्डिंग व हिटेड एक्स्टीरियर मिरर्ससह अॅण्टी-ग्लेअर
  • लेदर/लेदरेट अपहोल्स्टरी
  • फ्रंट सीट्ससाठी 4-वे लंबर सपोर्ट
  • फ्रेमलेस इंटीरिअर मिरर्ससोबत ऑटोमॅटिक अॅण्टी-ग्लेअर अॅक्शन
  • क्रूझ कंट्रोलसह स्पीड लिमिटर

इतर बातम्या

ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी

चिप संकटावर TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर

(Audi A4 Premium Variant Launched in India, Priced at Rs 39.99 lakh)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.