Audi ने बदलला Logo, जाणून घ्या कारण

Audi New Logo: Audi चा नवीन लोगो तुम्ही पाहिला आहे का? कारण, जगातील सर्वात मोठ्या ऑटो मार्केटमध्ये तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Audi चा नवा लोगो समोर आला आहे. हा लोगो नेमका कसा आहे, Audi ने लोगो का बदलला, याविषयी जाणून घ्या.

Audi ने बदलला Logo, जाणून घ्या कारण
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 6:23 PM

Audi New Logo: तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Audi चा नवा लोगो समोर आला आहे. तुम्हीही Audi चे चाहते असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, Audi ने लोगो का बदलला, नवा लोगो नेमका कोणता आहे, याविषयी सर्व माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. जाणून घ्या.

जर्मन कार निर्माता कंपनी Audi ने चीनमध्ये आपला आयकॉनिक फोर रिंग लोगो बदलला आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर सर्वांनाच धक्का बसला आहे. एवढंच नाही तर कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

Audi चा लोगो लक्झरी कारचे प्रतीक

खरं तर या डिझाईनमुळे लोकांना कंपनीच्या गाड्या खूप आवडल्या होत्या. हा लोगो 1930 च्या दशकापासून लक्झरी कारचे प्रतीक आहे. परंतु हा नवीन ई कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक स्पोर्टबॅकचा भाग नाही.

Audi चा नवा लोगो कसा आहे?

या महिन्याच्या सुरुवातीला शांघायमध्ये हा नवा लोगो प्रदर्शित करण्यात आला. गाडीच्या समोर सर्व अक्षरात ‘Audi’ लिहिले होते. जग्वारच्या नव्या लोगोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे.

तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

जगातील सर्वात मोठ्या वाहन बाजारपेठेकडे तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन Audi लोगो डिझाईन करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या सहविकासासाठी चिनी वाहन निर्माता कंपनी SAIC बरोबरच्या प्रकल्पाचा हा एक भाग आहे.

Audi आणि SAIC या दोन्ही कंपन्यांनी चीनमधील बाजारपेठेतील हिस्सा परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, जिथे जुन्या स्थानिक कंपन्या आणि परदेशी वाहन निर्माते EV आणि हायब्रीड-केंद्रित स्पर्धकांकडून पराभूत होत आहेत.

Audi च्या 4-रिंग डिझाईनचा अर्थ काय होता?

Audi च्या आयकॉनिक 4 रिंगच्या लोगोला विशेष ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. हा लोगो Audi च्या संस्थापक आणि त्याच्या 4 संस्थापक ब्रँडचे प्रतीक आहे.

चार रिंगचा अर्थ काय?

1932 मध्ये जर्मनीच्या चार प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांचे विलीनीकरण होऊन ‘ Auto Union AG ‘ नावाचा नवा समूह स्थापन झाला. या चार कंपन्यांचे चिन्ह Audi चा फोर-रिंग लोगो आहे. या चार कंपन्या होत्या. त्या खालीलप्रमाणे.

  • Audi
  • DKW
  • Horch
  • Wanderer

प्रत्येक रिंग एका कंपनीचे प्रतिनिधित्व करते. त्या वेळच्या आर्थिक संकटाला तोंड देणे आणि जर्मनीचा ऑटोमोबाईल उद्योग बळकट करणे हा या कंपन्यांच्या विलीनीकरणाचा उद्देश होता.

लोगोचे महत्त्व आणि डिझाईन काय?

हे चार रिंग समानता, एकता आणि भागीदारीचे प्रतीक आहेत. यात चार कंपन्या कशा प्रकारे एका मोठ्या गटात वाढल्या आहेत हे दिसून येते. हे ब्रँडच्या गुणवत्तेची परंपरा देखील प्रतिबिंबित करते. आज Audi चा लोगो ब्रँडच्या लक्झरी, इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचे प्रतीक बनला आहे. हा जगातील सर्वात ओळखीचा ऑटोमोबाईल लोगो आहे.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....