नादखुळा Audi Q7: आज होणार भारतात लॉंच, किंमत बघून चकित व्हाल…
मुंबईः भारतात आज Audi Q7 Facelift ही कार विक्रीसाठी बाजारात येते आहे. Ingolstadt वर आधारित असलेली ही कार (Car) दोन वर्षानंतर खास SUV भारतातील (Indian) ग्राहकांसाठी (Customer) उपलब्ध करुन देत आहेत. BS6 एमिशन स्टॅंडर्ड लागू होण्याच्या आधी कंपनीने 2020 च्या प्रारंभी ह मॉडेल काही कालावधीसाठी बंद करण्यात आले होते. पण आता मिड लाईफ फेसलिफ्ट आणि […]
मुंबईः भारतात आज Audi Q7 Facelift ही कार विक्रीसाठी बाजारात येते आहे. Ingolstadt वर आधारित असलेली ही कार (Car) दोन वर्षानंतर खास SUV भारतातील (Indian) ग्राहकांसाठी (Customer) उपलब्ध करुन देत आहेत. BS6 एमिशन स्टॅंडर्ड लागू होण्याच्या आधी कंपनीने 2020 च्या प्रारंभी ह मॉडेल काही कालावधीसाठी बंद करण्यात आले होते. पण आता मिड लाईफ फेसलिफ्ट आणि एक पेट्रोल ओनली ड्रायवट्रेनबरोबर पुन्हा ग्राहकांच्या भेटीला येत आहे. 2022 Audi Q7 ही कार आता दोन प्रकारात येत आहे. प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजीमध्ये तयार करण्यात आली आहे. ही कार सीकेडी युनिटमध्ये भारतात उपलब्ध होणार आहे.
या कारची निर्मिती औरंगाबादमधील स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे किंमतीच्या बाबतीत ही कार भारी असणार आहे. आता ही कार Q8 पेक्षा कमी किंमत असेल आणि 1 कोटीपेक्षा कमी रक्कम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2022 Audi Q7 ही कार भारतात 95 लाखा ते 1. 10 कोटी रुपये एवढेपर्यंत ही कार बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे.
Audi Q7 मध्ये असणार जबरदस्त फिचर्स
भारतात Audi Q7 ही कार सीकेडी युनिटमध्येच भारतात येणार आहे. Q7 ही कार कंपनीने नवीन मॉडेलमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली ईहे. SUV मध्ये क्रोम बॉर्डर आणि व्हर्टिकल स्लॅटसबरोबरच मोठी सिंगल फ्रेम गिल असणार आहे. हेडलाईट तर पूर्ण ग्रिल फुल एलईडीपासून तयार केले गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी ही कार ऑडी लेजरबरोबरच HD matrix LED टेक्नॉलॉजी हा पर्यायही उपलब्ध असणार आहे. SUV मध्ये इंटेक, नवीन अलॉय व्हील, slik LED Tel lights बरोबरच एक रिफाईन रियर बंपरबरोबर ही कार उपलब्ध असणार आहे.
अपडेट केबिन मिळणार
Q7 बरोबर अपडेट केबिन मिळणार आहे. त्यामध्ये दोन मोठे टचस्क्रीन आहेत जे टच कंट्रोलर असणार आहेत. या सगळ्या फिचर्सबरोबरच Advanced connectivity, Wi-Fi hotspot आणि साऊंड सिस्टीम यापेक्षा आणखी कंपनी ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देणार ते आता कार लॉंचवेळीच कळणार आहे.
ऑप्शनल हेड-अप डिस्प्ले बरोबरच ऑडी व्हर्च्यूअल कॉकपिटचीपण ऑफर असणार आहे. SUV नव्या स्टीयरिंग व्हील आणि प्रीमियम अपहोल्स्ट्रीबरोबरच ग्राहक खूष होतील असे फिचर्स या कारमध्ये आहेत.
Q7 फेसलिफ्टमध्ये 3 लिटर TFSI सिलिंडर, पेट्रोल इंजिन जो 335 bhp आणि 500 Nm पीक टॉर्क, आणि त्याबरोबरच 8 स्पीड टिपट्रॉनिक गिअरबॉक्स आणि क्वाट्रो AWD सिस्टमही सोबत असणार आहेत. नवीन Q5 सारखा Q7 मध्ये माईल्ड हायब्रिड सिस्टम असणार आहे.
संबंधित बातम्या