Automobile : कारच्या टायरचे आयुष्य वाढवायचे आहे? या चुका अवश्य टाळा
टायर बदण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने बरेच लोकं त्यांना बदलण्यास कचरतात. पण तुमच्या कारचे टायर खराब न होता वर्षानुवर्षे सुस्थितीत राहिले तर?
मुंबई : टायर हा कोणत्याही वाहनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो कारण त्यांचा थेट संपर्क रस्त्याशी असतो. कारचे परफॉर्मन्स आणि मायलेजही त्यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. हे टायर अति वापराणे जीर्ण होतात आणि नंतर ते बदलावे लागतात. कारण खराब टायरने (Car Tyre Tips) प्रवास केल्याने कधीही अपघात होऊ शकतो. मात्र टायर बदण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने बरेच लोकं त्यांना बदलण्यास कचरतात. पण तुमच्या कारचे टायर खराब न होता वर्षानुवर्षे सुस्थितीत राहिले तर? तुम्हालाही याविषयी नक्कीच जाणून घ्यायचे असेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या वाहनाच्या टायरचे आयुष्य वाढवू शकता.
वेळोवेळी टायरची अदला बदल करा
वाहनाचे टायर लवकर खराब होऊ नयेत यासाठी दर 4-5 हजार किलोमीटर अंतरावर वाहनाचे टायर बदला. म्हणजे, वाहनाचे पुढचे टायर मागच्या बाजूला आणि मागचे टायर पुढच्या बाजूला घ्या.
व्हील बॅलन्सिंगची काळजी घ्या
वाहनाच्या सर्व टायर्समध्ये योग्य संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये जेव्हा अडचण येते तेव्हा वाहनाच्या आत कंपन आणि धक्के जाणवतात, तसेच टायरही खूप वेगाने झिजतात. म्हणूनच वाहनाचे व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग वेळोवेळी करणे आवश्यक आहे.
टायरची हवा तपासा
टायर खराब होण्यापासून रोखण्यासाठी, दर आठ दिवसांनी वाहनाच्या टायरची हवा तपासली पाहिजे. यासोबतच टायर्सचा थर आणि साइडवॉलही नियमितपणे तपासले पाहिजे आणि कोणताही टायर पूर्णपणे खराब झाला असेल तर तो लवकर बदलणे हाच एकमेव पर्याय आहे.
खडतर रस्त्यांवरून चालविणे टाळा
कार खडतर रस्त्यावरून चालविणे टाळा. यामुळे टायरची अनावश्यक झिज होते. याशिवाय टायरमधले अलायमेंटसुद्धा बिघडते.