वाहन उत्पादक कंपन्यांचे ‘अच्छे दिन’ सुरु? फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री

2021 मध्ये ह्युंदाय (Hyundai), मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टाटा मोटर्सच्या (Tata Motors) वाहनांची जोरदार विक्री झाली आहे.

वाहन उत्पादक कंपन्यांचे 'अच्छे दिन' सुरु? फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री
Cars
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 12:43 PM

मुंबई : लॉकडाऊन संपल्यानंतर पर्सनल व्हीकल्सच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2021 मध्ये ह्युंदाय (Hyundai), मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टाटा मोटर्सच्या (Tata Motors) वाहनांची जोरदार विक्री झाली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या तिन्ही कंपन्यांनी मोठा नफा कमावला आहे. टोयोटा (Toyota), महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra), होंडा (Honda) या कंपन्यांच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीत 11.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. (Automotive industry witness strong growth in sales in India in February 2021)

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) 2021 च्या फेब्रुवारी महिन्यातील वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. या काळात कंपनीची एकूण 1,52,983 वाहनांची देशांतर्गत विक्री केली आहे. 2020 मध्ये याच महिन्यात विक्री झालेल्या 136,849 वाहनांच्या तुलनेत यामध्ये 11.8 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे, मारुती सुझुकीची फेब्रुवारी 2021 मधील एकूण (देशांतर्गत विक्री आणि परदेशी निर्यात) विक्री 1,64,469 इतकी नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत कंपनीने एकूण 147,110 वाहनांची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यात 11.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी 2020 मध्ये 1 लाख 54 हजार 123 वाहनांची विक्री केली होती. त्यामध्ये यंदा 4.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुतीने यंदा जानेवारी महिन्यात 1 लाघ 60 हजार 752 वाहनांची विक्री केली आहे. मारुतीच्या प्रवासी व्हेईकल्सची विक्री 6.9 टक्क्यांनी घसरून 103,435 वाहनांवर आली आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर निर्यातीत 29.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टोयोटाच्या वाहनविक्रीत 36 टक्क्यांची वाढ

दुसऱ्या बाजूला टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) कंपनीने फेब्रुवारी महिन्याचा सेल रिपोर्ट (विक्री अहवाल) जारी केला आहे. कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, फेब्रुवारी 2021 मध्ये भारतीय बाजारात Toyota ने एकूण 14,075 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. तर फेब्रुवारी 2020 मध्ये टोयोटाच्या एकूण 10,352 युनिट्स वाहनांची देशांतर्गत बाजारात विक्री झाली होती. जर आपण मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याशी तुलना केली तर या महिन्यात टोयोटाच्या विक्रीत 36% वाढ झाली आहे. जानेवारी 2021 च्या तुलनेत या कालावधीत कंपनीच्या विक्रीत फेब्रुवारी महिन्यात वाढ झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये टोयोटाने एकूण 11,126 वाहने भारतीय बाजारात विकली होती.

बजाज ऑटोच्या विक्रीत 6 टक्क्यांची वाढ

दुचाकी वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटोने सोमवारी सांगितले की फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या वाहनांची एकूण विक्री 6 टक्क्यांनी वाढून 3,75,017 वाहनांवर पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी याच महिन्यात त्यांनी 3,54,913 वाहने विकली होती. फेब्रुवारी महिन्यात कंपनीची देशांतर्गत बाजारात होणारी विक्री 2 टक्क्यांनी घसरून 1,64,811 वाहनांवर गेली, गेल्या वर्षी कंपनीने याच महिन्यात 1,68,747 वाहनांची विक्री केली होती.

कंपनीने म्हटले आहे की, फेब्रुवारीत त्याचा निर्यात व्यवसाय 13 टक्क्यांनी वाढून 2,10,206 वाहनांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी 1,86,166 वाहने निर्यात केली होती. बजाज ऑटो कंपनीची दुचाकींची विक्री फेब्रुवारीमध्ये 7 टक्क्यांनी वाढून 3,32,563 वाहनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 3,10,222 दुचाकींची विक्री केली होती. कंपनीच्या व्यावसायिक वाहनांची एकूण विक्री 5 टक्क्यांनी घसरून 42,454 वाहनांवर गेली आहे, त्या तुलनेत एक वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने 44,691 व्यावसायिक वाहनांची विक्री केली होती.

अशोक लेलँडच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ

हिंदुजा समूहाची अग्रणी कंपनी अशोक लेलँडकडून सोमवारी सांगण्यात आले आहे की, की फेब्रुवारी महिन्यात त्यांची विक्री 19 टक्क्यांनी वाढून 13,703 वाहनांवर गेली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एका वर्षापूर्वी याच महिन्यात त्यांनी 11,475 वाहनांची विक्री केली होती. या कालावधीत कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री 12,776 वाहनांची होती, जी मागील वर्षी 10,612 वाहने इतकी होती. यात एकूण 20 टक्के वृद्धी पाहावयास मिळाली आहे.

कंपनीने म्हटले आहे की मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री देशांतर्गत बाजारात 5 टक्क्यांनी वाढून 7,114 वाहनांवर गेली आहे, तर मागील वर्षी ती 6,745 वाहने इतकी होती. फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री 5,662 वाहने इतकी नोंदवण्यात आली आहे, तर फेब्रुवारी 2020 मध्ये ती 3,867 वाहने इतकी होती. यात 46 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

ह्युंदायच्या विक्रीत वाढ

ह्युंदाय मोटर इंडियाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात निर्यातीसह त्यांच्या एकूण विक्रीत 26.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये विक्री झालेल्या 48,910 युनिट्सच्या तुलनेत कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये एकूण विक्री 61,800 वाहनांची विक्री केली आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या देशांतर्गत विक्रीतही या महिन्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात विक्री झालेल्या 40,010 युनिट्समध्ये यंदा 29 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीने यंदा 51,600 वाहनांची देशांतर्गत बाजारात विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीनी निर्यात 14.6 टक्क्यांनी वाढली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीने 8,900 युनिट्स वाहनांची निर्यात केली होती. तर यंदा कंपनीने 10,200 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे.

इतर बातम्या

Renault Kiger ची डिलीव्हरी सुरु, कोणतं वेरिएंट तुमच्या खिशाला परवडेल? जाणून घ्या सर्व किंमती

लाँचिंगपूर्वीच Citroen C5 एयरक्रॉस साठी बुकिंग सुरु, 5 वर्षांचं Maintenance Package मिळणार

Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 36 टक्क्यांची वाढ

(Automotive industry witness strong growth in sales in India in February 2021)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.