डुअल-टोन शेडमध्ये Tata Punch लाँचिंगसाठी सज्ज, अल्ट्रॉजच्या प्लॅटफॉर्मवर सुसज्ज बेबी सफारीचं लाँचिंग कधी?
टाटा मोटर्स (Tata Motors) या सणासुदीच्या काळात आपली नवीन मायक्रो एसयूव्ही टाटा पंच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या कारचे काही फोटोज आधीच जारी केले आहेत,
मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) या सणासुदीच्या काळात आपली नवीन मायक्रो एसयूव्ही टाटा पंच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या कारचे काही फोटोज आधीच जारी केले आहेत, परंतु एसयूव्हीबद्दल बरेच काही उघड होणे बाकी आहे. अलीकडे, प्रोडक्शन-रेडी टेस्टिंग मॉडेल कव्हरशिवाय पाहायला मिळाले आणि यावेळी, आम्हाला कार नवीन ऑरेंज/ब्लॅक ड्युअल टोन कलर ऑप्शनमध्ये पाहायला मिळाळी. हे पंच कारचे टॉप-एंड व्हेरिएंट असल्याचे दिसून येते, जे एलईडी डे-टाइम रनिंग लँप आणि ड्युअल-टोन अॅलॉय व्हील सपोर्टेड आहे. (Baby Safari : Upcoming Tata Punch Spotted In A New Dual-Tone Orange Shade)
नवीन टाटा पंच ALFA-ARC (Agile Light Flexible Advanced Architecture) वर बनवलेली पहिली SUV असेल आणि भारतातील Nexon subcompact SUV च्या खाली असेल. पंचमध्ये कंपनीच्या इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेजचा वापर करण्यात आला आहे. ही कार आक्रमक स्टायलिंग लूकसह येते. टाटा मोटर्सने आधीच निळ्या आणि ड्युअल-टोन रंगाचे पर्याय जाहीर केले आहेत आणि सिंगल टोन रंगांसह आणखी दोन-टोन पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे
“सणासुदीच्या काळात ही कार नॅशनल लाँचिंगसाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पोर्टिंग डायनॅमिक्ससह टफ यूटिलिटीचं मिश्रण या कारमध्ये पाहायला मिळेल.
टाटा मोटर्सने पुष्टी केली आहे की, पंच आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या अपोझिट जॅक-अप हॅचबॅकपेक्षा अधिक श्रेष्ठ असेल आणि या एसयूव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स असतील. कंपनीने सूचित केले आहे की, या कारमध्ये काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील जसे की, ट्रॅक्शन मोड (सँड, रॉक, मड), हिल डिसेंट कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट, तसेच एसयूव्ही क्रेडेन्शियलसारखे काही सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील. ही कार पुढच्या बाजूला 185 मिमीच्या हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि 16 इंच अलॉय व्हीलसह येईल.
टाटाच्या सिग्नेचर स्प्लिट लायटिंग डिझाइनसह या कारचा फ्रंट एंड आक्रमक आहे. टाटा लोगोमधील काळ्या पॅनेलमध्ये ट्राय-अॅरो पॅटर्न देखील आहे, ज्याभोवती एलईडी डे-टाइम रनिंग लँप आहे. तर मुख्य हेडलॅम्प युनिट्स खाली स्थित आहेत, जे प्रोजेक्टर लाइटसह येतील. समोरचा बहुतेक भाग जड कव्हरने झाकलेला आहे आणि त्याला एक मोठा ट्राय-अॅरो डिझाईन ग्रिल आणि मोठे गोल फॉग लॅम्प मिळतात.
दमदार इंजिन
कंपनीने पंचचे स्पेसिफिकेशन्स उघड केले नाहीत, तथापि, काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला आहे की, नवीन पंच 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिनसह येईल, जे Altroz प्रीमियम हॅचबॅकला पॉवर देतं. पेट्रोल मिल 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड आणि पर्यायी AMT युनिटसह येण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यावर, नवीन टाटा पंच मारुती सुझुकी एस-प्रेसो आणि रेनॉल्ट क्विडशी स्पर्धा करेल. गेल्या वर्षी ऑटो एक्स्पो दरम्यान टाटा मोटर्सने पंचला HBX कॉन्सेप्ट मायक्रो-एसयूव्ही म्हणून पहिल्यांदा प्रदर्शित केली. पंच एसयूव्ही मारुती सुझुकी इग्निस आणि आगामी ह्युंडई मायक्रो-एसयूव्हीला टक्कर देईल, या कारला कॅस्पर म्हटले जाण्याची शक्यता आहे.
टाटाच्या एसयूव्ही फॅमिलीत चौथ्या वाहनाची एंट्री
तथापि, कंपनीने येथे वाहनाबद्दल फारशी माहिती सादर केलेली नाही. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, “टाटा पंच, हे नावाप्रमाणेच, एक एनरजेटिक व्हीकल आहे ज्यामध्ये कुठेही जाण्याची क्षमता आहे. ते पुढे म्हणाले की, ही कार ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल. कॉम्पॅक्ट सिटी कारमध्ये एसयूव्ही फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार बनवण्यात आली आहे. पंच आमच्या एसयूव्ही फॅमिलीमधील चौथे वाहन आहे. अशा परिस्थितीत, आता आम्ही रेंज ऑप्शन वाढवण्याचा विचार करीत आहोत.
इतर बातम्या
ओला इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल! दोन दिवसांत तब्बल 1100 कोटींची कमाई
PHOTO | डस्टर ते हॅरियर पर्यंतच्या बेस्ट मिडसाईज एसयूव्हीवर मोठी सवलत, जाणून घ्या तपशील
(Baby Safari : Upcoming Tata Punch Spotted In A New Dual-Tone Orange Shade)