Bajaj Auto चा जलवा कायम, एका महिन्यात 3,69,448 वाहनांची विक्री

अलीकडेच ऑटो कंपन्यांनी मार्च महिन्यातील विक्रीचे आकडे शेअर केले आहेत, त्यावरुन स्पष्ट होतंय की, हा महिना ऑटो कंपन्यांसाठी चांगला होता.

Bajaj Auto चा जलवा कायम, एका महिन्यात 3,69,448 वाहनांची विक्री
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 11:03 AM

मुंबई : अलीकडेच ऑटो कंपन्यांनी मार्च महिन्यातील विक्रीचे आकडे शेअर केले आहेत, त्यावरुन स्पष्ट होतंय की, मार्च महिना ऑटो कंपन्यांसाठी खूप चांगला होता. वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) मार्च महिन्यात एकूण 3,69,448 वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी कोव्हिड-19 च्या विघ्नादरम्यानही कंपनीने (मार्च 2020) 2,42,575 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. (Bajaj Auto sells 3.69 units two-wheeler in March 2021)

बजाज ऑटोने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने देशांतर्गत बाजारात गेल्या महिन्यात 1,98,551 युनिट्स वाहनांची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात देशांतर्गत बाजारात 1,16,541 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. मार्च 2020 मध्ये कंपनीने 2,10,976 दुचाकी वाहनांची विक्री केली होती. तर एकूण 39,315 युनिट्स व्यावसायिक वाहनांची विक्री केली होती.

बजाज ऑटोने म्हटले आहे की, गेल्या महिन्यात त्यांनी एकूण 1,70,897 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे. मार्च 2020 मध्ये कंपनीने 1,26,034 युनिट्स वाहनांची निर्यात केली होती. संपूर्ण आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीने 39,72,914 वाहनांची विक्री केली होती. तर 2019-20 मध्ये कंपनीने 46,15,212 वाहनांची विक्री केली होती. यामध्ये तब्बल 14 टक्क्यांची घट झाली होती. दरम्यान, कंपनीने देशांतर्गत बाजारात 2019-20 च्या 24,44,107 युनिट्स वाहनांच्या विक्रीत 21 टक्क्यांची घट होऊन 19,18,667 वाहनांची विक्री कंपनीने केली आहे.

टीव्हीएसकडूनही जोरदार विक्री

बजाज ऑटो व्यतिरिक्त टीव्हीएस मोटर कंपनीने मार्चमध्ये एकूण 3,22,683 वाहनांची विक्री केली आहे. मार्च 2020 मध्ये कोविड -19 मुळे लॉकडाऊन लादण्यात आले, तेव्हा कंपनीने 1,44,739 वाहनांची विक्री केली होती. टीव्हीएस मोटरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मार्च 2021 मध्ये कंपनीने एकूण 3,07,437 युनिट्स इतक्या दुचाकींची विक्री केली आहे. मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,33,988 युनिट्स दुचाकींची विक्री केली होते. गेल्या महिन्यात देशांतर्गत दुचाकींची विक्री 2,02,155 युनिट्स इतकी होती. मार्च 2020 मध्ये ही आकडेवारी 94,103 वाहनं इतकी होती.

मार्च 2020 मध्ये कंपनीने 66,673 युनिट्स स्कूटर्सची विक्री केली होती. तर गेल्या महिन्यात (मार्च 2021 मध्ये कंपनीने 1,04,513 युनिट्स स्कूटरची विक्री केली आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने एकूण 1,19,422 युनिट्स वाहनांची निर्यात केली आहे. तर मार्च 2020 मध्ये कंपनीने केवळ 50,197 युनिट्स वाहनांची निर्यात केली होती. कंपनीने गेल्या महिन्यात केलेल्या एकूण निर्यातीपैकी 1,05,282 युनिट्स दुचाकी वाहनं आहेत. मार्च 2020 मध्ये हीच आकडेवारी 39,885 युनिट्स इतकी होती.

इतर बातम्या

‘या’ 5 गाड्यांचा भारतीय बाजारात बोलबाला, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

अवघ्या 69 हजारात खरेदी करा 1.45 लाखांची Bajaj Avenger Cruise 220

(Bajaj Auto sells 3.69 units two-wheeler in March 2021)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.