भारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप

बजाज ऑटो नोव्हेंबरमध्ये डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट मिळून भारतातील सर्वाधिक विक्री करणारा मोटरसायकल ब्रँड ठरला आहे. पुण्यातील मोटारसायकल उत्पादक कंपनीने गेल्या महिन्यात 3,38,473 युनिट्सची विक्री नोंदवली आहे.

भारतीय मोटारसायकल बाजारात Hero MotoCorp ला पछाडत Bajaj Auto ची पहिल्या नंबरवर झेप
Bajaj Auto
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 12:46 PM

Top Motorcycle Brand in November : बजाज ऑटो नोव्हेंबरमध्ये डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट मिळून भारतातील सर्वाधिक विक्री करणारा मोटरसायकल ब्रँड ठरला आहे. पुण्यातील मोटारसायकल उत्पादक कंपनीने गेल्या महिन्यात 3,38,473 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये कंपनीने 3,84,993 युनिट्सची विक्री केली होती. यंदा त्या विक्रीत 12 टक्क्यांनी घट झाली असली तरी ही कंपनी नंबर 1 बनली आहे. Hero MotoCorp कंपनीने गेली अनेक वर्ष मार्केटवर राज्य केलं आहे, ही कंपनी यावेळी मात्र दुसऱ्या क्रमांकावर ढकलली गेली आहे. हिरो मोटोकॉर्पने नोव्हेंबरमध्ये डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट मिळून 329,185 मोटारसायकली विकल्या आहेत. (Bajaj Auto to No. 1 in motorcycle November sales)

Hero MotoCorp ने नोव्हेंबर 2021 मध्ये एकूण मोटरसायकल विक्रीत 39 टक्क्यांनी घट नोंदवली आहे कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात 5,41,437 युनिट्सची विक्री केली होती.

नोव्हेंबर 2021 हा एक दुर्मिळ प्रसंग आहे, कारण बजाज ऑटोने एकूण मोटरसायकल विक्रीत Hero MotoCorp ला मागे टाकले आहे. तथापि, Hero MotoCorp ने मोटरसायकल आणि स्कूटर विक्री दोन्ही एकत्र करून दुचाकींच्या विक्रीच्या बाबतीत टेबलमध्ये अव्वल स्थान कायम ठेवले. बजाज ऑटोने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 3,38,473 युनिट्सची विक्री केली आहे, तर Hero MotoCorp ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण 3,49,393 दुचाकी विकल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात निर्यात

बजाज ऑटोने त्यांच्या एक्सपोर्टमध्ये 2 टक्के घट नोंदवली आहे. तरीसुद्धा त्यांच्या निम्म्याहून अधिक मोटारसायकलची विक्री आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झाल्याचे दिसून आले, असे असूनही त्यांच्या निर्यातीत घट झाली. कंपनीने 1,93,520 मोटारसायकली परदेशी बाजारपेठेत पाठवल्या आणि देशांतर्गत बाजारात 1,44,953 मोटारसायकलींची नोंदणी केली.

बजाजची 70 देशांमध्ये निर्यात

लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये, देशांतर्गत मोटरसायकल ब्रँडने सर्वाधिक विक्रीची नोंद केली आहे. बजाज ऑटो सध्या जगभरातील सुमारे 70 देशांमध्ये आपल्या मोटारसायकली विकते. दुसरीकडे, Hero MotoCorp, लोअर डिस्प्लेसमेंट मोटरसायकल सेगमेंटमध्ये स्पेशलिस्ट आहे.

Hero च्या ग्रामीण भागातील विक्रीवर परिणाम

एंट्री-लेव्हल कम्युटर बाईक विभागातील मंदी आणि हाय-एंड मॉडेल्सकडे ग्राहकांची वाढलेली पसंती हे देखील Hero MotoCorp च्या विरुद्ध योगदान देणारे घटक होते. याचा परिणाम ग्रामीण भागात Hero MotoCorp च्या विक्रीवर झाला, जिथे कंपनीचा ग्राहकवर्ग मजबूत आहे.

इतर बातम्या

ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी

2022 KTM 390 Adventure लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि बाईकची खासियत

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर

(Bajaj Auto to No. 1 in motorcycle November sales)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.