महाराष्ट्र-कर्नाटकमधील बाजारात धुमाकूळ, Bajaj ची Electric Scooter आणखी दोन शहरात दाखल
बजाज ऑटो (Bajaj Auto) त्यांच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Chetek Electric Scooter) रिटेल टचपॉईंट्सच्या यादीत नवीन शहरांचा समावेश करत आहे.
मुंबई : बजाज ऑटो (Bajaj Auto) त्यांच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Chetek Electric Scooter) रिटेल टचपॉईंट्सच्या यादीत नवीन शहरांचा समावेश करत आहे. कंपनीने आता चेन्नई (तामिळनाडू) आणि हैदराबाद (तेलंगणा) येथे चेतक खरेदीदारांची नोंदणी सुरू केली आहे. कंपनीने हैदराबादमध्ये कुकटपल्ली आणि काचीगुडा येथे दोन डीलर्सची नियुक्ती केली आहे, तर चेतक इलेक्ट्रिक डीलरशिप चेन्नईमध्ये कोलाथूर आणि अण्णा सलाई या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. (Bajaj Chetak Electric Scooter Registrations started In Chennai and Hyderabad)
तेलंगणा आणि तामिळनाडू व्यतिरिक्त ही स्कूटर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन अन्य भारतीय राज्यांमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्यातील ऑटोमेकरने भारतातील पहिल्या बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरचा विस्तार वाढवला आहे. 2022 पर्यंत बजाजने 22 भारतीय शहरांमध्ये स्कूटर सादर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
स्कूटरची किंमत
ही स्कूटर अॅथर 450 एक्स (Ather 450X) आणि TVS iQube ला जोरदार टक्कर देत आहे. ही स्कूटर 1.28 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किंमतीसह लाँच करण्यात आली होती. आता या स्कूटरची किंमत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही स्कूटर 1.47 लाख (एक्स-शोरूम) रुपये या किंमतीत विकली जात आहे. फेम – 2 आणि राज्य अनुदानानंतर (स्टेट सबसिडी) या स्कूटरची किंमत 1.08 लाख (एक्स-शोरूम) इतकी झाली आहे. तर किरकोळ बाजारात या स्कूटरची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.
Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स
ही इलेक्ट्रिक स्कूटर अर्बन आणि प्रीमियम या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात 3 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक आणि 4.08 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. सिंगल चार्जवर ही स्कूटर 95 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. या स्कूटरची बॅटरी केवळ 5 तासात पूर्णपणे चार्ज करू शकता. या स्कूटरमधील इतर फीचर्सविषयी सांगायचे झाल्यास यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, key लेस स्टार्ट-स्टॉप सिस्टम आणि डिझायनर अॅलोय व्हील्स देण्यात आले आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. त्याशिवाय हँडलिंगसाठी यामध्ये कंबाईन्ड ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस) देखील देण्यात आली आहे.
इतर बातम्या
Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी
Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली
(Bajaj Chetak Electric Scooter Registrations started In Chennai and Hyderabad)