‘या’ तीन शहरांमध्ये उपलब्ध होणार बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर; आजपासून बुकिंग सुरु

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 3.8 केडब्ल्यू इलेक्ट्रिक मोटरद्वारा संचालित आहे. ही स्कूटर 5 एचपीची पॉवर आणि 16.2 एनएमचा टार्क जनरेट करते. मोटरला 3 केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरीसोबत जोडले गेले आहे.

'या' तीन शहरांमध्ये उपलब्ध होणार बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर; आजपासून बुकिंग सुरु
'या' तीन शहरांमध्ये उपलब्ध होणार बजाज चेतकची इलेक्ट्रिक स्कूटर
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 7:50 AM

नवी दिल्ली : बजाज चेतक (Bajaj Chetak) इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच देशभरातील युजर्ससाठी उपलब्ध असेल. बजाज ऑटो (Bajaj Auto) स्कूटर आता म्हैसूर, मंगलोर आणि औरंगाबाद या आणखी तीन शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. या शहरांतील खरेदीदार इलेक्ट्रिक स्कूटरचे इच्छुक आहेत, ते खरेदीदार आज 22 जुलैपासून बुक करू शकतात. त्यांना 2000 रुपयांच्या टोकन रकमेसह स्कूटर बुक करता येईल. या शहरांमध्ये युजर्ससाठी स्कूटरची नोंदणी आधीपासूनच खुली आहे. (Bajaj Chetak’s electric scooter will be available in three cities; Booking starts today)

बजाज ऑटोने नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 2022 पर्यंत 24 शहरांच्या बाजारात दाखल करण्याची योजना आखली आहे. कंपनीने नागपूर बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली होती. बुकिंग 16 जुलैपासून नागपूरमध्ये सुरु झाली होती. बजाज ऑटोने सुरुवातीला पुणे आणि बंगळुरूमध्ये बुकिंग खुली केली होती. परंतु स्लॉट 48 तासांच्या आत संपूर्णपणे सब्सक्राइब झाले होते.

22 शहरांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्याची योजना

बजाज ऑटोने प्रथम पुणे आणि बंगळुरूमध्ये बुकिंग सुरु केली होती परंतु स्लॉट 48 तासांच्या आत संपूर्णपणे सब्सक्राइब झाले होते. कंपनीला नागपूरमध्ये देखील असाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीला 2022 पर्यंत 22 शहरांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सादर करायची असून तसे उद्दिष्ट कंपनीने डोळ्यासमोर ठेवले आहे. मागील ICE स्कूटरच्या निर्मितीला जवळपास 15 वर्षे उलटल्यानंतर 2020 मध्ये कंपनीद्वारे चेतक ब्रॅण्डला EV अर्थात इलेक्ट्रीक वाहनाच्या रूपामध्ये पुनर्जीवित केले होते. नवीन इलेक्ट्रीक वाहनाचे उत्पादन कंपनीच्या पुण्यातील चाकण प्लांटमध्ये केले जात आहे.

स्कूटरची खास फीचर्स

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 3.8 केडब्ल्यू इलेक्ट्रिक मोटरद्वारा संचालित आहे. ही स्कूटर 5 एचपीची पॉवर आणि 16.2 एनएमचा टार्क जनरेट करते. मोटरला 3 केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरीसोबत जोडले गेले आहे. जेणेकरून एकदा पूर्ण चार्जिंग केल्यानंतर 95 किमीपर्यंत रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. इलेक्ट्रिक स्कूटर ताशी 70 किमीच्या टॉप स्पीडने धावू शकते, असेही कंपनीने म्हटले आहे.

स्कूटरची बॅटरी फुल्ल चार्ज करण्यासाठी जवळपास 5 तास लागतात आणि फास्ट चार्जिंग सिस्टमची मदत घेतल्यास या स्कूटरची बॅटरी अवघ्या एका तासामध्ये 25 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. बजाज कंपनीच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी लाइफ 70,000 किलोमीटर किंवा 7 वर्षांपर्यंत आहे. या बॅटरीवर कंपनी 3 वर्षे किंवा 50,000 किलोमीटरपर्यंतची वारंटी देत आहे. (Bajaj Chetak’s electric scooter will be available in three cities; Booking starts today)

शाहरुख खानसोबत भेट घडवून देण्याचा बहाणा, दादर स्थानकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण, पोलिसांनी कसं सोडवलं ?

Video: राजीव सातवांचं काय वय होतं ह्या जगातून जाण्याचं? आरजेडीच्या खासदारांचं देशभर चर्चेत असलेलं भाषण ऐकलंत?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.