55 हजारांहून कमी किंमतीत Bajaj आणि Hero च्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक, तुमच्यासाठी बेस्ट कोणती?
कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेल्या या दोन्ही बाईक्सची (Hero HF 100 आणि Bajaj CT110X) बाजारात जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
मुंबई : बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) अलीकडेच दोन ढासू बाईक्स लाँच केल्या आहेत. कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेल्या या दोन्ही बाईक्सची बाजारात जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे. Hero HF 100 आणि Bajaj CT110X अशी या दोन्ही बाईक्सची नावं आहेत. दोन्ही गाड्यांच्या किंमती 56 हजार रुपयांपेक्षा कमी आहेत. दोन्ही बाईक्स अनुक्रमे Hero HF Deluxe आणि Bajaj CT110 या गाड्यांचे अपग्रेडेड व्हेरिएंट्स आहेत, ज्या नव्या अवतारात सादर करण्यात आल्या आहेत. (Bajaj CT110X Vs Hero HF 100 which is best bike under Rs 55000, check everything about it)
कशी आहे Bajaj CT110X?
ववीन CT110X हे एक टॉप व्हेरिएंट असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या बाईकची किंमत 55,494 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या बाईकमध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी या बाईकमध्ये मोटो क्रॅश गार्ड्स आणि मोल्डेड फुटहोल्ड्स देण्यात आले आहेत. या दुचाकीमध्ये सर्वात मोठं अपग्रेड म्हणजे रियर कॅरियर, जे 7 किलोग्रामपर्यंतचं वजन उचलू शकतं. या व्यतिरिक्त तुम्हाला ड्युअल टेक्स्चर आणि ड्युअल स्टिच फिनिश सीट, सेमी नॉबी टायर, सेमी डबल क्रॅडल फ्रेम मिळेल.
कशी आहे Hero HF 100?
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) अलीकडेच आपली सर्वात स्वस्त बाईक हिरो एचएफ 100 (Hero HF 100) लाँच केली आहे. ही बाईक दिसायला आकर्षक असून यात खूप चांगले ग्राफिक्स वापरले आहेत. या बाईकची रचना एचएफ डिलक्सप्रमाणेच (HF Deluxe) आहे. हिरो एचएफ 100 (Hero HF 100) बाईक किकस्टार्ट, ड्रम ब्रेक आणि अॅलोय व्हील्ससह सादर करण्यात आली आहे आणि या बाईकची किंमत फक्त 49,400 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे.
Hero HF 100 आणि Bajaj CT110X चं इंजिन
Hero HF 100 या मोटारसायकलमध्ये 97.2cc क्षमतेचं सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 8.36PS पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करु शकतं. यामध्ये 9.1 लीटरचा फ्यूल टँक देण्यात आला आहे. तर Bajaj CT110X मध्ये 115 सीसी डीटीएस-आय इंजिन देण्यात आलं आहे जे 7500rpm वर 6.33kW मॅक्सिमम पॉवर जनरेट करु शकतं आणि 5000rpm वर 9.81 Nm पीक टार्क देईल. ही बाईक 5 स्पीड गिअरबॉक्ससह सादर करण्यात आली आहे. त्याच वेळी, त्यामध्ये सेमी-नॉबी टायर्स आणि 170 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहेत.
Hero HF 100 आणि Bajaj CT110X के फीचर्स
Bajaj CT110X या बाईकमध्ये सुरक्षितता आणि आरामदायी प्रवासासाठी या बाईकमध्ये मोटो क्रॅश गार्ड्स आणि मोल्डेड फुटहोल्ड्स देण्यात आले आहेत. या दुचाकीमध्ये सर्वात मोठं अपग्रेड म्हणजे रियर कॅरियर, जे 7 किलोग्रामपर्यंतचं वजन उचलू शकतं. या व्यतिरिक्त तुम्हाला ड्युअल टेक्स्चर आणि ड्युअल स्टिच फिनिश सीट, सेमी नॉबी टायर, सेमी डबल क्रॅडल फ्रेम मिळेल.
दुसरीकडे, जर आपण Hero HF 100 च्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये किकस्टार्ट, ड्रम ब्रेक्स आणि अॅलोय व्हील्स आहेत. या बाईकमधील इतर फीचर्सविषयी सांगायचे झाल्यास, यामध्ये ट्यूबलेस टायर्स देण्यात आले आहेत. तसेच ब्लॅक थीमवर मेटल ग्रॅब रेलसह डिझाइन केलेले एक्झॉस्ट आणि क्रॅश गार्ड आहेत.
इतर बातम्या
Hero च्या ‘या’ दोन स्वस्त बाईक्सपैकी तुमच्यासाठी परफेक्ट कोणती? किंमतीत केवळ 1300 रुपयांचा फरक
Two Wheelers च्या विक्रीत ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स, Splendor आणि Activa चा धुमाकूळ
अवघ्या 36 हजारात खरेदी करा 1 लाखाची Bajaj Pulsar 150
(Bajaj CT110X Vs Hero HF 100 which is best bike under Rs 55000, check everything about it)