Bajaj Freedom 125 CNG : आता बुक केली, तर कधी मिळणार CNG बाईकची डिलीवरी, जाणून घ्या वेटिंग पीरियड?

Bajaj Freedom 125 CNG Bike Waiting Period: तुम्ही बजाजची नवीन Bajaj CNG Motorcycle खरेदी करण्याचा प्लान करताय, तर सर्वात आधी बाइकचा वेटिंग पीरियड जाणून घ्या. लॉन्च नंतर या बाइकची जबरदस्त डिमांड दिसून येतेय. आज बुक केल्यास या बाइकची डिलीवरी कधी मिळणार? त्या बद्दल जाणून घ्या.

Bajaj Freedom 125 CNG : आता बुक केली, तर कधी मिळणार CNG बाईकची डिलीवरी, जाणून घ्या वेटिंग पीरियड?
Bajaj CNG Bke Waiting PeriodImage Credit source: bajaj auto
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 3:41 PM

जगातील पहिली CNG Motorcycle ग्राहकांसाठी लॉन्च झाली आहे. डुअल फ्यूलवर पळणाऱ्या या बाइकबद्दल ग्राहकांमध्ये एक वेगळी क्रेज दिसून येतेय. ही बाइक लॉन्च होऊन फक्त काही दिवस झालेत. इतक्या कमी दिवसात या बाइकचा वेटिंग पीरियड (Bajaj Freedom 125 CNG Waiting Period) तीन महिन्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय. बाइक तुम्ही 1 हजार रुपये बुकिंग अमाऊंट देऊन आपल्या नावाने बुक करु शकता. बाइकची बुकिंग देशभरात सुरु आहे. सीएनजी सिलेंडर बद्दल बोलायच झाल्यास कंपनीने बाइक सीटच्या खाली हा सिलेंडर प्लेस केलाय.

रिपोर्ट्सनुसार, काही शहरात वेटिंग पीरियड एक महीन्यापेक्षा पण कमी आहे. मुंबईत वेटिंग पीरियड 20 ते 30 दिवसांचा आहे. पुण्यात बाइकचा वेटिंग पीरियड 30 ते 45 दिवसांचा गुजरातमध्ये वेटिंग पीरियड 45 दिवस ते तीन महिन्याचा आहे. बजाज सीएनजी बाइकची पहिली डिलीवरी पुण्यात श्री प्रवीण थोरात यांना करण्यात आली आहे.

Bajaj Freedom 125 CNG Price

बजाजच्या या सीएनजी बाइकचे एकूण तीन वेरिएंट्स आहेत. बेस ड्रम वेरिएंटची किंमत 95,000 रुपये, ड्रम एलईडी वेरिएंटची किंमत 1.05 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि टॉप डिस्क वेरिएंटची किंमत 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Bajaj Freedom 125 CNG Mileage आणि इंजिन डिटेल्स

या बाइकमध्ये 124.5 सीसीच इंजिन देण्यात आलं आहे. त्यातून 9.3bhp पावर आणि 9.7Nm टॉर्क जेनरेट होतो. 5 स्पीड गियरबॉक्स असलेल्या या बाइकमध्ये 2 लीटरचा पेट्रोल टँक आणि 2 किलोग्रॅम सीएनजी सिलेंडर मिळतो. बाइक एक किलोग्राममध्ये 102 किलोमीटर पर्यंत (2 किलोग्राम में 200 किलोमीटर पर्यंत) आणि 2 लीटर पेट्रोलमध्ये 130 किलोमीटर पर्यंत पळू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

Bajaj CNG Bike Features

सीएनजी बाइकमध्ये एलसीडी इंस्ट्रूमेंट कंसोल आहे. स्मार्टफोन कनेक्टिविटीसोबत येतो. डिस्प्लेला बॅटरी स्टेटस कॉल आणि मिस्ड कॉल अलर्ट सारखी माहिती मिळेल. बाइकमध्ये ग्राहकांच्या सुविधेसाठी यूएसबी पोर्ट देण्यात आलाय.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.