बजाजने लाँच केली स्पोर्ट पल्सरची अपडेट रेंज… दीड लाखांत घरी आणा 250 सीसीची दमदार बाईक
पल्सरच्या या नवीन अपडेट करण्यात आलेल्या बाईक्समध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील देण्यात आलेले आहेत. यामुळे गाडीच्या गिअर पोजीशनसह स्पीड आणि मायलेजचीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या फ्यूअल टँक 14 लीटरचे देण्यात आलेले आहेत.

भारतातील दुचाकी सेगमेंटमध्ये बजाजचा (Bajaj) दबदबा कायम आहे. कंपनीने शुक्रवारी (24 जून) भारतीय बाजारात आपली लोकप्रिय स्पोर्ट बाईक पल्सरची (Sport Pulsar) रेंजला अपडेट करताना दोन नवीन मॉडल्स लाँच केले आहेत. एबीएस टेक्नोलॉजीसह अनेक नवीन फीचर्स आणि वैशिष्ट्यांसह आपले दोन्ही मॉडेल्सला कंपनीने N250 आणि F250 असे नावे दिली आहेत. आकर्षक लूक आणि दमदार इंजिनसह (powerful engine) असलेल्या या दोन्ही बाईक्सची थीम पूर्णपणे ब्लॅक ठेवण्यात आली आहे. या दोन्ही बाईक्सची सुरुवातीची किंमत 1.50 लाख रुपये (एक्सशोरुम) ठेवण्यात आली आहे. तरुणांमध्ये पल्सरविषयी क्रेझ आहे. या शिवाय बजाजचे हे सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे या नवीन बाईक्सबाबत तरुणांमध्ये खास आकर्षण दिसून येत आहे.
पॉवरफूल इंजिन
बजाजकडून लाँच करण्यात आलेल्या अपडेटेड पल्सरचे इंजिन अतिशय पावरफूल असून ते फ्यूअल इंजेक्टेड आहे. हे 24.1bhp ची पॉवर आणि 21.5 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकमध्ये 5 स्पीड मॅन्यूअल गिअर बॉक्स देण्यात आला आहे.
ड्युअल एंटी लोक ब्रेकिंग सिस्टीम
नवीन पल्सर ड्युअल चॅनल एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमने परिपूर्ण आहे. पल्सरमध्ये अनेक कलर्स उपलब्ध आहेत. परंतु यात सिंगल एबीएस सिस्टीम असून नवीन पल्सरची किंमत मागील किंमतीच्या तुलनेत सहा हजार रुपयांनी जास्त आहे.



ड्युअल डिस्क ब्रेक
नवीन पल्सर ड्युअल डिस्क ब्रेकने परिपूर्ण आहे. यात फ्रंटमध्ये 300 एमएम आणि मागील भागात 230 एमएमचे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यात 17 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आलेले आहेत. या शिवाय फ्रंटमध्ये टेलेस्कोपिक फार्क देखील देण्यात आला आहे.
सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरचा वापर
पल्सरच्या या नवीन अपडेट करण्यात आलेल्या बाईक्समध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देखील देण्यात आलेले आहेत. यामुळे गाडीच्या गिअर पोजीशनसह स्पीड आणि मायलेजचीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या फ्यूअल टँक 14 लीटरचे देण्यात आलेले आहेत.