बजाज पल्सर Dagger Edge एडिशन बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बजाज ऑटोने (Bajaj Auto) आज आपल्या पल्सर रेंज मोटरसायकलची ‘Dagger Edge’ आवृत्ती सादर केली केली आहे. (Bajaj Pulsar Dagger Edge)

बजाज पल्सर Dagger Edge एडिशन बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Bajaj Pulsar Dagger Edge Edition
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 3:44 PM

मुंबई : बजाज ऑटोने (Bajaj Auto) आज आपल्या पल्सर रेंज मोटरसायकलची ‘Dagger Edge’ आवृत्ती सादर केली केली आहे. पल्सर लाइनअपमध्ये Pulsar 150, Pulsar 180 आणि पल्सर Pulsar 220F समाविष्ट आहेत. नवीन डॅगर एज (Dagger Edge) पल्सर एडिशन नवीन एक्सटीरियर पेंट स्कीम्स आणि अपडेटेड ग्राफिक्ससह सादर करण्यात आली आहे. एक्सटीरियर व्यतिरिक्त यामध्ये अन्य कोणतेही बदल केले गेले नाहीत. (Bajaj Pulsar Dagger Edge Edition Bike Launched, know Price and Features)

बजाज पल्सर च्या Dagger Edge एडिशनच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, Pulsar 150 ची किंमत 1,01,818 रुपये, Pulsar 150 Twin-Disc ची किंमत 1,04,819 रुपये, Pulsar 180 ची किंमत 1,09,651 रुपये और Pulsar 220F ची किंमत 1,28,250 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Pulsar 150 Dagger Edge एडिशनचे फीचर्स

Pulsar 150 Dagger Edge एडिशन पर्ल व्हाईट आणि सफायर ब्लू कलर या दोन कलर स्कीम्समध्ये सादर करण्यात आली आहे. यापूर्वी मडगार्ड आणि रिमवर रेड हायलाइट देण्यात आला होता, आताच्या Dagger Edge एडिशनमधील बाईक्सच्या मडगार्ड आणि रिमवर व्हाईट हायलाइट कलर देण्यात आला आहे. नवीन पेंट स्कीमव्यतिरिक्त यामध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. यात 149.5 सीसी फोर-स्ट्रोक इंजिन आहे जे 8,500 आरपीएम वर 13.8bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 6500 आरपीएम वर पीक टॉर्क जनरेट करते.

Pulsar 180 Dagger Edge एडिशनचे फीचर्स

ही बाईक पर्ल व्हाइट, व्हॉल्कॅनिक रेड आणि स्पार्कल ब्लू मॅट कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. व्हाईट-ब्लॅक ग्राफिक्स आणि हायलाइट्स व्हॉल्कॅनिक रेड कलरसह उपलब्ध असताना स्पार्कल ब्लॅक ऑप्शनमध्ये केवळ रेड ग्राफिक्स आणि हायलाइट्स उपलब्ध आहेत. यात 178.6 सीसी इंजिन आहे जे 8,500 आरपीएम वर 16.8 बीएचपी पॉवर आणि 6500 आरपीएमवर वर 14.52 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

Pulsar 220F Dagger Edge एडिशनचे फीचर्स

Pulsar 220F पर्ल व्हाइट, व्हॉल्केनिक रेड, स्पार्कल ब्लू आणि सफायर ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त यामध्ये अन्य कोणतेही बदल केले गेलेले नाहीत. यात 220 सीसी इंजिन आहे जे 8500rpm वर 20.1bhp ची पॉवर आणि 7000rpm वर 18.55Nm पीक टॉर्क जनरेट करते.

इतर बातम्या

रेल्वे ट्रॅकवर चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला Jawa कंपनीकडून 1.75 लाखांची बाईक गिफ्ट

55 हजारांहून कमी किंमतीत Bajaj आणि Hero च्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक, तुमच्यासाठी बेस्ट कोणती?

पॉवरफुल इंजिन, ढासू फीचर्ससह Bajaj Pulsar NS 125 बाजारात, किंमत…

(Bajaj Pulsar Dagger Edge Edition Bike Launched, know Price and Features)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.