पॉवरफुल इंजिन, ढासू फीचर्ससह Bajaj Pulsar NS 125 बाजारात, किंमत…

बजाज ऑटोने (Bajaj Auto) आज पल्सर एनएस 125 (Pulsar NS 125) ही बाईक 93,690 रुपये या किंमतीसह भारतात लाँच केली आहे. 

पॉवरफुल इंजिन, ढासू फीचर्ससह Bajaj Pulsar NS 125 बाजारात, किंमत...
Bajaj Pulsar Ns 125
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 4:01 PM

मुंबई : बजाज ऑटोने (Bajaj Auto) आज भारतात पल्सर एनएस 125 (Pulsar NS 125) ही बाईक 93,690 रुपये या किंमतीसह लाँच केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही नवीन बाईक पॉवर-पॅक परफॉरमन्स आणि मल्टिपल क्लास लीडिंग फिचर्सने सुसज्ज आहे. कंपनीने या बाईकच्या लाँचिंगसह तरुण रायडर्सना लक्ष्य केले आहे. (Bajaj Pulsar NS 125 launched in India with powerful engine, check price and features)

कंपनीचा असा दावा आहे की, नवीन Pulsar NS 125 मध्ये काही नवीन क्लास लीडिंग फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे या सेगमेंटमधील इतर बाईक्सपेक्षा ही बाईक अधिक चांगली सिद्ध होईल. पल्सर Pulsar NS 125 रेग्युलर Pulsar 125 पेक्षा अधिक वजनदार आहे. या बाईकचे वजन 144 किलो आहे, हे वजन जुन्या बाईकपेक्षा 4 किलोने जास्त आहे.

दमदार इंजिन

Pulsar NS 125 मध्ये BS 6 कम्पलायंट 125cc सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड DTS-i इंजिन देण्यात आलं आहे. या इंजिनसह 5-स्पीड गीअरबॉक्स देण्यात आला आहे, जो आधीच्या बाईकपेक्षा अधिक दमदार आहे. हे इंजिन 12 पीएसची मॅक्सिमम उर्जा आणि 11 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त या बाईकमध्ये 17 इंचाचा अ‍ॅलोय व्हील, फ्रंटला 240mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130mm डिस्क ब्रेक आहे, जो सीबीएससह येतो. या बाईकचा ग्राऊंड क्लीयरन्स 179mm इतका आहे.

Pulsar NS 125 चं डिझाईन आणि फीचर्स

या बाईकच्या डिझाईनबद्दल सांगायचे झाल्यास, यामध्ये फारसा बदल झालेला नाही. Pulsar NS 125 च्या फ्रंटला जुन्या बाईकप्रमाणे वुल्फ-आय डिझाइन पाहायला मिळेल. तसेच या बाईकमध्ये शार्प टँक एक्सटेंशन मिळेल, ज्यामुळे बाईकच्या स्पोर्टी लुकमध्ये अजून भर घातली जाते. तसेच यामधील ग्राफिक एलिमेंट्स वाढवण्यात आले आहेत. बाईकच्या रियरमध्ये सिग्नेचर ट्विन LED-स्ट्रिप टेल लाईट देण्यात आली आहे. या बाईकमध्ये ABS देण्यात आलेली नाही.

चार कलर ऑप्शन्स

कंपनीने ही बाईक चार कलर ऑप्शन्ससह सादर केली आहे. ज्यामध्ये फेअरी ऑरेंज, बर्न्ट रेड, बीच ब्लू आणि पेवरेट ग्रे या रंगांचा समावेश आहे. ही बाईक बाजारात KTM 125 Duke ला टक्कर देईल. जर किंमतीचा विचार केला तर ही बाईक जुन्हा बाईकपेक्षा महाग आहे.

इतर बातम्या

अवघ्या 36 हजारात खरेदी करा 1 लाखाची Bajaj Pulsar 150

Hero च्या ‘या’ दोन स्वस्त बाईक्सपैकी तुमच्यासाठी परफेक्ट कोणती? किंमतीत केवळ 1300 रुपयांचा फरक

Hero Destini 125 वर मोठी सूट, स्कूटरमध्ये नवं हिरो कनेक्ट फीचरही मिळणार

(Bajaj Pulsar NS 125 launched in India with powerful engine, check price and features)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.