AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Second Hand Car | खरेदी करताय सेकंड हँड कार, ती चोरीची तर नाही ना? असे ओळखा

Second Hand Car | जर तुम्ही सेंकड हँड कार खरेदी करत असाल तर अधिक सजग राहणे आवश्यक आहे. दुसऱ्याकडून कार खरेदी करताना ती चोरीची तर नाही ना, याची खात्री करुन घ्या. कार चोरीची आहे का, त्याच व्यक्तीची आहे, हे तुम्हाला कसं ओळखता येईल, असा प्रश्न पडणं सहाजिकच आहे, जाणून घेऊयात..

Second Hand Car | खरेदी करताय सेकंड हँड कार, ती चोरीची तर नाही ना? असे ओळखा
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 4:03 PM

नवी दिल्ली | 16 डिसेंबर 2023 : अनेकदा कार खरेदी करणे आवश्यक असते. पण बजेट मार खाते. नवीन कार महाग आहेत. त्यामुळे अनेक जण सेंकड हँड कारचा पर्याय निवडतात. त्यासाठी कार बाजार अथवा एजंटच्यामार्फत अनेक जण कार खरेदीची योजना आखतात. पण मध्यस्थी व्यक्ती योग्य नसल्यास फसवणूक होऊ शकते. एखाद्यावेळी चोरीची कार माथी मारण्यात येते. त्यामुळे सेकंड हँड कार खरेदी करताना नेहमी सजग राहा. पण कार चोरीची असल्यास ती ओळखावी कशी? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर काय? चला तर जाणून घेऊयात.

घरबसल्या जाणून घ्या

तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे कार चोरीची आहे की नाही हे ओळखू शकता. त्यामुळे एखादी कार आवडली असेल तर ती चोरीची आहे की नाही, याची माहिती मिळते. त्यासाठी गुगलचा आणि सरकारच्या काही अहवालाचा आधार घेता येतो. वाहनाच्या काही क्रमांकावरुन तुम्ही वाहनाची माहिती मिळवू शकता. या पद्धतीने केवळ चोरीचीच कार नाही तर एखाद्या गुन्हयात वाहनाचा वापर झाला असेल तर त्याची पण माहिती मिळते. कार संबंधी काही कायदेशीर वाद असल्यास त्याची पण माहिती घेता येते.

हे सुद्धा वाचा

CCTNS चा वापर

  1. NCRB च्या अहवालाआधारे तुम्ही सहज कारविषयीची माहिती मिळवू शकता. हा रिपोर्ट तुम्ही विनामूल्य सहज डाऊनलोड करु शकता. सर्वात अगोदर गुगलवर जाऊन Digital Police Citizen Services लिहा आणि सर्च करा. तुम्ही CCTNS लिहून गुगल करु शकता. सर्चमधील पहिली अधिकृत लिंक उघडा. या पोर्टलवर Citizen Login असा एक डॅशबोर्ड दिसेल.
  2. तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. क्रमांक टाकल्यानंतर याठिकाणी Send OTP बटणाचा वापर करता येईल. तुमच्या क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचे नाव टाका आणि नंतर बॉक्समधील कॅप्चा टाका. आता कॅप्चा टाकून लॉग-इन करा.
  3. लॉग-इन केल्यानंतर Generate Vehicle NOC हा पर्याय दिसेल. या पर्यायावर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला कारचे नाव, व्हेईकल टाईप, रजिस्ट्रेशन क्रमांक, Chassis Number आणि Engine Number टाकावा लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर एक फाईल डाऊनलोड होईल.
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.