कार विकत घेताय? या टिप्स वाचाल तर मिळेल कमी बजेटमध्ये धांसू कार
सामान्य व्यक्ती आपल्या बजेटमधील कार विकत घेण्यासाठी विविध ऑनलाईन साईट्स आणि कितीतरी शोरुमला भेट देत असतो. पण घरबसल्या या काही टीप्स वाचाल तर कोणत्याही अडचणीविना बजेट कार घेऊ शकाल.
मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपला कन्फर्ट झोन शोधत असतो. आयुष्य सुकर करण्यासह अडअडचणीच्या काळात एका ठिकाणाहून दुसरीकडे त्वरीत पोहचण्यासाठी प्रत्येकाला स्वत:ची कार हवी असते. तसेच अनेकांना कार किंवा कोणतही वाहन म्हटलं तर केवळ यंत्र नसून त्याच्यासोबत भावनाही जोडलेल्या असतात. त्यामुळे नवीन कार विकत घेताना काही गोष्टींचा अभ्यास केल्यास तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगली कार तुम्हाला मिळू शकते.
तुमचं बजेट आणि गरज ठरवा
सध्या बाजारात विविध कंपन्याच्या, विविध फिचर्ससह, विविध किंमतीतील कार्स उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वांत आधी तुम्हाला तुमचं बजेट आणि गरज ठरवणं महत्त्वाचं आहे. किती रुपयांपर्यंत कार विकत घेऊ शकता? लोन किती मिळू शकते? या गोष्टींचा विचार करुन बजेट ठरवणे सोपे जाते. तसेच कार केवळ फॅमिली वापरासाठी हवी आहे की एखाद्या व्यवसायासाठी याचा विचार केल्यास तुम्हाला कार सिलेक्ट करताना अडचण येणार नाही.
सेकेंड हँड कारचा पर्यायही उबलब्ध
समजा तुम्हाला हवी असलेली कार 12 लाख रुपयांना मिळते. पण तुमचे बजेट 5 लाखांचेच आहे. अशावेळी तुम्ही सेकेंड हँड कारचा (Buy Second Hand Car) पर्यायही पाहू शकता. कारण सध्या बाजारात अनेक असेही शोरुम आहेत जे चांगल्या कंडीशनमधील सेकेंड हँड कार विकतात. तसेच काही ऑनलाईन साईट्सद्वारा तुम्ही थेट कार विकू इच्छिणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करुन त्याची कार विकत घेऊ शकता. कारण कार ही अशी गोष्ट आहे जीची किंमत कमी होते वाढत नाही त्यामुळे सेकेंड हँड कारचा पर्यायही चांगला आहे.
पुन्हा विकत असतानाची किंमत
कार विकत घेताना तिची Resell Value अर्थात पुन्हा विकतानाची किंमत जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. कारण कधी तुम्ही आर्थिक अडचणीत सापडलात, तर तुम्हाला कार चांगल्या किंमतीत आणि त्वरीत विकता येऊ शकते. त्यामुळे दिर्घकाळ चालणारी, सर्व पार्ट्स बाजारात उपलब्ध असणारी आणि चांगल्या कंपनीची कार विकत घेणे महत्वाचे आहे.
चांगला विक्रेता निवडा
सध्या बाजारात अनेक कार विक्रेते उपलब्ध आहेत. आतातर ऑनलाईन साईट्सद्वाराही कार विकत घेता येते. दरम्यान प्रत्येक विक्रेता हा वेगवेगळे डिस्काऊंट देत असल्याने या सर्वाचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. कोणता डिलर (Car Dealer) चांगल डिस्काऊंट देत आहे आणि त्याची सर्विस कशी आहे याचा विचार कार घेताना करणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगली कार मिळेल.
कार लोन
अनेकदा आपली स्वप्नातील कार आपल्या बजेटपेक्षा महाग असते. तेव्हा सेकेंड हँड कारसह कार लोन हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला 14 लाखांची कार विकत घ्यायचीये पण तुमत्याकडे 5 लाखच आहेत अशावेळी तुम्ही उर्वरीत 9 लाखांचे लोन अर्थात कर्ज (Car Loan) घेऊ शकता. मात्र कर्ज घेताना कोणती बँक कार लोन किती टक्क्यांनी देते आहे. हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणती बँक किती डाऊन पेमेंट घेऊन आणि किती टक्के व्याजाने कार लोन देत आहे हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे.
हे ही वाचा –
इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता राष्ट्रीय महामार्गावर ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करणार, एनएचएआयची योजना
5 नव्या फीचर्ससह Maruti Suzuki Baleno लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कशी असेल नवी कार
लांचिंगआधीच Hyundai च्या ‘या’ SUV साठी 4000 हून अधिक बुकिंग्स, डिझेल व्हेरिएंटला पसंती
(Before Purchasing A New Car Read This few tips and Buy Car Easily and in Budget)