1.5 ते 2 रुपयात एक किलोमीटरचं मायलेज, Hero, TVS, Bajaj च्या एकापेक्षा एक बाईक बाजारात उपलब्ध

कोरोना महामारी आणि त्यावरील निर्बंधात्मक सोशल डिस्टन्सिंगचे नियम यामुळे प्रत्येकाला स्वतःची गाडी हवी आहे. परिणामी, देशात दुचाकीचे (बाईक) उत्पादन आणि वापर लक्षणीय प्रमाणात वाढत आहे.

1.5 ते 2 रुपयात एक किलोमीटरचं मायलेज, Hero, TVS, Bajaj च्या एकापेक्षा एक बाईक बाजारात उपलब्ध
best mileage motorcycles
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 3:10 PM

मुंबई : कोरोना महामारी आणि त्यावरील निर्बंधात्मक सोशल डिस्टन्सिंगचे नियम यामुळे प्रत्येकाला स्वतःची गाडी हवी आहे. परिणामी, देशात दुचाकीचे (बाईक) उत्पादन आणि वापर लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. अनेक कंपन्या बाजारात नवनवीन बाइक्स लाँच करत आहेत. मात्र, पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक जास्त मायलेज असलेल्या बाइक्सच्या शोधात आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उत्तम मायलेज असलेल्या बाईक्सबाबतची माहिती देणार आहोत. (best mileage motorcycles that users can ride up to 1 km in less than 2 rupees, Hero, TVS, Bajaj)

2 रुपयांपेक्षा कमी किमतीत एक किलोमीटर अंतर कापणाऱ्या बाइक्स बाजारात उपलब्ध आहेत. म्हणजेच एक लीटर पेट्रोलमध्ये 70 किमीपर्यंतचे मायलेज देणाऱ्या अनेक गाड्या मार्केटमध्ये आहेत. या यादीत Hero, TVS, Bajaj कंपनीच्या बाइक्सचा समावेश आहे.

Hero Splendor Plus

Hero Splendor Plus या हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या बाईकमध्ये 97.2cc चे इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोलवर चालणारी Hero Splendor Plus 8000rpm वर 7.91bhp पॉवर आणि 6000rpm वर 8.05Nm टॉर्क जनरेट करते. बाईक सिंगल सिलेंडर इंजिनने चालते. ही बाईक 62 kmpl चं मायलेज देते. Hero Splendor Plus ची किंमत 64,850 रुपये आहे.

TVS Raider 125

TVS Raider 125 ही TVS कंपनीची बाईक 124.8cc इंजिनसह येते. TVS Rider 125 बाईक प्रति लीटर 60 किमी पर्यंत मायलेज देते. एवढेच नाही तर ही बाईक 7500 rpm वर 11.2 bhp चं पॉवर आऊटपुट देते. ही बाईक BS6 इंजिनसह खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Honda CD 110 Dream

Honda CD 110 Dream ही Honda कंपनीची बाईक 64.5 kmpl चं मायलेज देते. ही बाईक 109.51cc इंजिनसह सुसज्ज आहे. या बाईकमधील इंजिन 7500 rpm वर 8.67 bhp आणि 5500 rpm वर 9.30 Nm टॉर्क जनरेट करते. Honda CD 110 मध्ये ड्रीम BS6 इंजिन आहे आणि या बाईकची ऑन-रोड किंमत 76,629 रुपये आहे.

Bajaj Platina 100

बजाज प्लॅटिना 100 या बजाज कंपनीच्या बाईकची ऑन-रोड किंमत 62,000 रुपये इतकी आहे. या बाईकमध्ये 102cc इंजिन देण्यात आलं आहे, हे इंजिन 7500rpm वर 7.9bhp पॉवर आणि 5500rpm वर 8.34Nm टॉर्क जनरेट करते. प्लॅटिना बाईक 72 kmpl मायलेज देते.

इतर बातम्या

Maruti ते Hyundai, किफायतशीर किंमतीत ऑटोमॅटिक गियरवाल्या कार, पाहा यादी

सिंगल चार्जवर 95 किमी ड्रायव्हिंग रेंज, Bajaj Chetak Electric Scooter पुणे, बंगळुरुनंतर आता मुंबईतही उपलब्ध

i20 ते Cretaपर्यंत Hyundaiच्या कार महागल्या, इथे पाहा मॉडेल्स आणि त्याच्या किंमती

(best mileage motorcycles that users can ride up to 1 km in less than 2 rupees, Hero, TVS, Bajaj)

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.