Electric Car : किआ ईव्ही 6 लाँचिंगनंतर कंपनीची मोठी घोषणा… भारतीयांसाठी देशात बनविणार इलेक्ट्रिक कार
एका रिपोर्टनुसार, कंपनी ईव्ही 6 नंतर आता एक नवीन इलेक्ट्रिक कार इंडिया सेंट्रीक ईव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन ईव्ही पूर्णपणे भारतीय ग्राहकांना केंद्रीत ठेवून तयार करण्यात आली आहे.
मुंबई : साउथ कोरियन कार निर्माता कंपनी किआने (Kia) गुरुवारी (2 जून) भारतीय कार बाजारामध्ये किआ ईव्ही 6 ची लाँचिंग केली. ईव्ही 6 लाँचिंग करताच कंपनीने भारतात आपली पहिली ईव्ही लाँच करत ईव्ही सेगमेंटमध्ये आपले पहिले पाउल ठेवले आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनी ईव्ही 6 (Kia EV6) नंतर आता एक नवीन इलेक्ट्रिक कार इंडिया सेंट्रीक ईव्ही (India Centric EV) लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन ईव्ही पूर्णपणे भारतीय ग्राहकांना केद्रीत ठेवून तयार करण्यात आली आहे. याचे प्रोडक्शनदेखील भारतात केले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ईव्ही 6 च्या सुरुवातीच्या किंमत 59.95 लाखांच्या तुलनेत या नवीन ईव्हीची किंमत काहीशी कमी करण्याचेही संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत.
लाँचिंगमध्ये इंडिया सेंट्रीक ईव्हीची घोषणा
कंपनीने ईव्ही 6 च्या लाँचिंगच्या दरम्यान, भारतीय युजर्स बेस्डला लक्षात घेउन इंडिया सेंट्रीक ईव्हीच्या निर्मितीचीही घोषणा केली आहे. या नवीन ईव्हीसाठी ग्राहकांना अजून तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. अपकमिंग कार रिक्रिएशनल व्हीकलच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहे. या आधी लाँच झालेली कॅरेंसलाही किआने एमपीव्हीच्या ऐवजी आरव्ही सांगितले आहे. कंपनीचा दावा आहे, की नवीन ईव्ही आकर्षक इंटीरियर आणि रेंजसह दाखल होणार आहे.
देशात बनेल इलेक्ट्रिक कार
किआ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ ताए-जिन पार्क यांनी सांगितले, की कंपनी भारतीय इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. एचटी ऑटोच्या रिपोर्टनुसार, कंपनीने या शिवाय भारतीय मार्केटमध्ये ईव्हीसह आपल्या नवीन प्रोडक्टसला बनविण्यासाठी देशातच आपले इंफ्रास्ट्रक्चरला डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीयांसाठी कंपनी भारतातच ईव्ही बनविणार आहे.
ग्राहकांचा कल पाहून प्रोडक्शन
भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेतील मागणी पाहता कंपनीने बजेट इलेक्ट्रिक वाहनांना जास्तीत जास्त संख्येने बाजारात आणण्याचे धोरण ठरविले आहे. भारतीय ग्राहकधार्जिनी पध्दतीमध्ये अनेक विविधता निर्माण झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या पसंतीला उतरतील अशा ईव्ही सादर करण्याकडे कंपनीचा कल आहे. त्यानुसारच वाहनांचेही प्रोडक्शन करण्यात येणार आहे.