BMW: बीएमडब्ल्यूने भारतात लाँच केली लिमिटेड एडिशन मॉडेल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
बीएमडब्ल्यू ट्विनपॉवर टर्बो तंत्रज्ञानासह उपलब्ध होणार आहे. कारमध्ये 2 लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे ज्याच्या माध्यमातून 258 hp ची कमाल पॉवर आणि 400 Nm चा पीक टॉर्क जनरेट होणार आहे. हे इंजिन 8 स्पीड स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
बीएमडब्ल्यू इंडियाने (BMW India) गुरुवारी देशात बीएमडब्ल्यू 6 (BMW 6) सिरीजमधील नवीन विशेष 50 Jahre M Edition लाँच करण्याची घोषणा केली. कंपनीचे म्हणणे आहे, की आयकॉनिक BMW M GmbH च्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन मॉडेलची घोषणा करण्यात आली आहे. ही कार लिमीटेड एडिशनमध्ये (limited edition model) उपलब्ध करून दिली जाणार असून दिल्लीमध्ये या कारची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत 72 लाख 90 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. बीएमडब्ल्यू 6 सिरीजमधील 50 Jahre M Edition चे प्रोडक्शन भारतातील चेन्नई येथील बीएमडब्ल्यू ग्रुप प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर केले जाईल. BMW 630i M Sport ही कार पेट्रोल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध केली जाईल असे सांगण्यात आले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन बीएमडब्ल्यूचे बुकिंग देखील ऑनलाइन सुरू झाले आहे.
कसे असणार इंजिन
ही कार बीएमडब्ल्यू ट्विनपॉवर टर्बो तंत्रज्ञानासह उपलब्ध होणार आहे. कारमध्ये 2 लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे ज्याच्या माध्यमातून 258 hp ची कमाल पॉवर आणि 400 Nm चा पीक टॉर्क जनरेट होणार आहे. हे इंजिन 8 स्पीड स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. कारमधील स्टीयरिंग व्हील पॅडल शिफ्टर्स आणि ब्रेकिंग फंक्शनसह क्रूझ कंट्रोलच्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. ही कार केवळ 6.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग धारण करते. तसेच स्टँडर्ड अॅडॉप्टिव्ह 2 एक्सल एअर सस्पेंशनचा वापर हे कारच्या कामगिरीचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. कार विविध मोड्ससह उपलब्ध असून त्यात Comfort, Comfort+, Sport, Sport+ आणि Adaptive आदींचा समावेश आहे.
दमदार फीचर्स
केबिनच्या आत, कारमध्ये आधुनिक कॉकपिट टेक्नीकचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 3D नेव्हिगेशनसह BMW ऑपरेटिंग सिस्टम 7.0 सह BMW Live Cockpit Professional, 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिसप्ले आणि 12.3 इंच कंट्रोल डिसप्ले देण्यात आला आहे. या कारमध्ये बीएमडब्ल्यू व्हर्च्युअल असिस्टंटचा वापर करण्यात आला आहे. या फीचरद्वारे कारमधील लोक फक्त बोलून अनेक फंक्शन्स ऑपरेट करू शकतात. याशिवाय मोबाईल फोन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto साठी वायरलेस चार्जिंग मिळते.
विविध कलर उपलब्ध
नवीन लिमिटेड एडिशन मॉडेल विविध रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. BMW टांझानाइट ब्लू मेटॅलिक, एम कार्बन ब्लॅक, बर्निना ग्रे अंबर इफेक्ट आणि मिनरल व्हाइट, कॉग्नाक फिनिशमध्ये कॉन्ट्रास्ट स्टिचिंग विथ नॅचरल लेदर डकोटा अपहोल्स्ट्रीसह पेअर करण्यात आले आहे.