‘या’ दिवशी BMW स्कूटर लाँच होणार, जाणून घ्या किंमत काय?

कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याची खातरजमा केलीय. भारतातील बीएमडब्ल्यू कंपनीची मॅक्सी स्कूटर C400GT 12 ऑक्टोबर रोजी लॉन्च केली जाईल. त्यानंतर स्कूटरची विक्री सुरू होईल. ही स्कूटर भारतातील सर्वात प्रीमियम ग्रेड स्कूटर असू शकते. या स्कूटरमध्ये अनेक लेटेस्ट फिचर्स दिसतील. एवढेच नाही तर या स्कूटरचे इंजिन 350 सीसीचे असेल.

'या' दिवशी BMW स्कूटर लाँच होणार, जाणून घ्या किंमत काय?
BMW scooter
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 8:49 AM

नवी दिल्ली : जर्मन ऑटोमेकर BMW Motorrad India काही काळापासून आपल्या आगामी स्कूटर लाँच करण्याबाबत चर्चेत आहे. अलीकडेच कंपनीने एक टीझर रिलीज केला, त्यानंतर लोकांची उत्सुकता वाढली. बीएमडब्ल्यूच्या नवीन स्कूटरबद्दल अनेक टीझर आणि लीक्स समोर आलेत, ज्यात स्कूटरची वैशिष्ट्ये सांगितली गेलीत, परंतु कंपनीने अधिकृतपणे अद्याप जास्त माहिती शेअर केलेली नाही. काही दिवसांपूर्वी बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लॉन्च होणाऱ्या मॅक्सी स्कूटरचा टिझरही प्रसिद्ध केलाय.

मॅक्सी स्कूटर लाँचिंग ‘या’ दिवशी होणार

कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याची खातरजमा केलीय. भारतातील बीएमडब्ल्यू कंपनीची मॅक्सी स्कूटर C400GT 12 ऑक्टोबर रोजी लॉन्च केली जाईल. त्यानंतर स्कूटरची विक्री सुरू होईल. ही स्कूटर भारतातील सर्वात प्रीमियम ग्रेड स्कूटर असू शकते. या स्कूटरमध्ये अनेक लेटेस्ट फिचर्स दिसतील. एवढेच नाही तर या स्कूटरचे इंजिन 350 सीसीचे असेल.

स्कूटरची वैशिष्ट्ये

बीएमडब्ल्यू मॅक्सी स्कूटर सी 400 जीटी रिव्हाइज्ड ऑटोमॅटिक स्टॅबिलिटी कंट्रोल (एएससी) शी जोडली गेलीय. या स्कूटरचा टॉप स्पीड 139 किमी प्रतितास सांगितला जात आहे. या स्कूटरचे ब्रेक स्कूटर चालकाला आरामदायक वाटतात. एवढेच नाही तर स्कूटरच्या सीव्हीटी गिअरबॉक्सची अद्ययावत आवृत्ती वापरण्यात आलीय.

स्कूटरची किंमत किती असेल?

स्कूटरची विक्री 12 ऑक्टोबरला लॉन्च झाल्यानंतर लगेच सुरू होईल. या स्कूटरची किंमत सुमारे 5 लाख रुपये एक्स-शोरूम असेल. कंपनीने स्कूटरची प्री-बुकिंग सुरू केलीय, ज्यासाठी ग्राहकांना किमान 1 लाख रुपये भरावे लागतील. इतकी महागडी स्कूटर भारतात अजून विकली गेली नाही. लोकांचा विश्वास आहे की, 5 लाखांत कार खरेदी करता येते. आता या स्कूटरला भारतीय बाजारपेठेत कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे बाकी आहे. असा अंदाज लावला जात आहे की, जेव्हा बीएमडब्ल्यू मॅक्सी स्कूटर भारतीय बाजारात येईल, तेव्हा लोकांना ती विकत घेण्याविषयी वेगळाच उत्साह दिसू शकेल. जर तुम्हाला स्कूटरचीही आवड असेल तर आजच BMW मॅक्सी स्कूटर C400GT साठी प्री-बुक करा.

संबंधित बातम्या

आता ‘या’ राज्यात तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार, QR कोड आधारित DL आणि RC जारी

मोफत घरी घेऊन जा Hero Electric Scooter, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

BMW scooter will be launched on this day, find out the price?

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.