एका क्लिकवर कारचं रुप बदला, BMW रंग बदलणारी कार सादर करणार

BMW ने पुढील वर्षीच्या कन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2022 साठी जय्यत तयारी केली आहे. कंपनी अशा कार्यक्रमात दरवर्षी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज कार्स सादर करत असते.

एका क्लिकवर कारचं रुप बदला, BMW रंग बदलणारी कार सादर करणार
BMW iX Electric Car
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 5:07 PM

मुंबई : BMW ने पुढील वर्षीच्या कन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2022 साठी जय्यत तयारी केली आहे. कंपनी अशा कार्यक्रमात दरवर्षी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज कार्स सादर करत असते. परंतु या कार्यक्रमात ऑल-इलेक्ट्रिक BMW SUV iX M60 सादर करेल आणि दुसरे म्हणजे, कंपनी रंग बदलणारे तंत्रज्ञान देखील सादर करू शकते. कारचा रंग बदलण्यासाठी केवळ एका बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे. मात्र, कंपनीने अद्याप अशी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. (BMW to lanch Car That Changes Color With Touch of a Button)

हे तंत्रज्ञान BMW कोणती कार किंवा कोणत्या व्हेरिएंटसाठी सादर करणार आहे याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. तसेच कंपनीकडून अद्याप याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. हे तंत्रज्ञान किती रंगांमध्ये कारचं रुप बदलण्यास सक्षम असेल याबद्दलही काही सांगण्यात आलेलं नाही.

असा अंदाज वर्तवला जात आहे की, बीएमडब्ल्यूचे हे लेटेस्ट तंत्रज्ञान कंपनीची लेटेस्ट कार iX M60 इलेक्ट्रिक वाहनात दिले जाऊ शकते. सध्या आपल्याला इव्हेंट सुरू होण्याची वाट पाहावी लागणार असली तरी त्यादरम्यान अनेक प्रकारच्या माहितीवरून अधिकृतपणे पडदा हटवला जाईल. BMW iX M60 कारमध्ये 111.5 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून यात ड्युअल मोटर्सचा सेटअप मिळेल. यामुळे ही कार अधिक चांगल्या मायलेज पॉवरसह बाजारात दाखल होईल, यात शंका नाही.

सिंगल चार्जमध्ये 483 किमी रेंज

BMW iX xDrive50 मध्ये एक विशेष प्रकारचा सेटअप देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ही कार 516 hp पॉवर जनरेट करू शकते. या कारमध्ये असलेले इंजिन 765 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते, जे प्रत्येक एक्सलला पॉवर पाठवते. या कारमध्ये 111.5 kWh ची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 105.2 kWh ची क्षमता देते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार 483 किमीची रेंज देऊ शकते.

Mercedes, Jaguar ला टक्कर

BMW ने अलीकडेच iX इलेक्ट्रिक SUV भारतात लॉन्च केली आहे, ज्या कारची किंमत 1.16 कोटी रुपये आहे. ही कार Mercedes EQC, Jaguar i-Pace आणि Audi e-tron ला टक्कर देईल. कारच्या पुढच्या बाजूला डबल विशबोन सस्पेंशन, स्टीयरिंग कॉलम, पुढील आणि मागील रोल एक्सल्स आणि युनिक इंडिव्हिजुअल डँपर कंट्रोल मिळते. IX हे BMW च्या CLAR प्लॅटफॉर्मच्या विकासावर आधारित आहे जे त्याच्या कंस्ट्रक्शनमध्ये कार्बन फायबर आणि अॅल्युमिनियम वापरते.

इतर बातम्या

Ola S1 ते Hero Electric Optima, 1 लाखाहून कमी किंमतीत 4 इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

Honda Brio ते Maruti Swift Dzire, 3 लाखांहून कमी किंमतीत 5 टॉप क्लास कार खरेदीची संधी

Audi Q7 | 2022 ऑडी Q7 चे उत्पादन भारतात सुरू, दमदार फिचर्स, सुपर लूक, जाणून घ्या बहूचर्चित ऑडी Q7बद्द्ल सर्व काही

(BMW to lanch Car That Changes Color With Touch of a Button)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.