BMW : बीएमडब्ल्यूच्या ब्रँड न्यू जेन x1 आणि इलेक्ट्रिक एसयुव्ही ix1 लवकरच होणार लाँच … 29 मिनिटांत 80 टक्के चार्ज

नवीन जनरेशनच्या बीएमडब्ल्यू x1 मध्ये अगदी पातळ एलईडी हेडलाइट्‌स देण्यात आले आहेत. हे हेडलाइट्‌स डेटाइम रनिंग लँप्ससाठी इनव्हर्टेड एल पॅटर्नसारख्या फीचर्ससह उपलब्ध होणार आहेत.

BMW : बीएमडब्ल्यूच्या ब्रँड न्यू जेन x1 आणि इलेक्ट्रिक एसयुव्ही ix1 लवकरच होणार लाँच ... 29 मिनिटांत 80 टक्के चार्ज
बीएमडब्ल्यूImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 2:31 PM

मुंबई : बीएमडब्ल्यूने (BMW) आपल्या 3rd जनरेशन x1 (gen x1) आणि याची फुल ईव्ही व्हर्जन, ix1 चे (electric SUV ix1) ऑफिशिअल लाँचिंग केले आहे. या दोन्ही वाहनांना संपूर्णपणे नवीन एक्सटीरियर आणि इंटीरियर तसेच पॉवरट्रेन ऑप्शनच्या एका वाइड रेंजसोबत सादर करण्यात आले आहे. नवीन जनरेशनच्या बीएमडब्ल्यू x1 मध्ये अगदी पातळ एलईडी हेडलाइट्‌स देण्यात आले आहेत. हे हेडलाइट्‌स डेटाइम रनिंग लँप्ससाठी इनव्हर्टेड एल पॅटर्नसारख्या फीचर्ससह उपलब्ध होणार आहेत. हेडलाइट्‌स मोठे, क्रोम हेवी किडनी ग्रीलसह येणार आहेत. साइड प्रोफाइलमध्ये चंकीयर व्हील आर्च आणि फ्लॅश डोर हँडल देण्यात आले आहेत.

डायमेंशनबाबत बोलायचे झाल्यास, नवीन x1 आपल्या सक्सेसरपेक्षा काही प्रमाणात मोठा आहे. यात 22 मीमी लांब व्हीलबेस आणि 31 मीमी चवडी ट्रॅकसोबत केबिनमध्येही चांगली स्पेस देण्यात आली आहे. इंटीरिअरबाबत बोलायचे झाल्यास, नवीन जेन x1 मध्ये दोन सिरीज ॲक्टिव्ह टूरर सारखे एक इंटीरियर डिझाइन देण्यात आली आहे. बीएमडब्ल्यूने नवीन एसयुव्हीला 8th जनरेशनच्या बीएमडब्ल्यूचे आइड्राइव्ह आपरेटींग सिस्टमने परिपूर्ण केली आहे. यात 10.7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट आणि 10.25 इंचाचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. बीएमडब्ल्यूचा दावा आहे, की नवीन सीट लांबच्या अंतराला चांगली सुविधा देतील.

हे सुद्धा वाचा

न्यू जेन एक्स 1 बीएमडब्ल्यूच्या एफएएआर आर्किटेक्चरवर आधारीत असून जी बीएमडब्ल्यू 2 सिरीज ॲक्टिव्ह टूरर आणि अपकमिंग नवीन जनरेशनच्या मिनी कंट्रीमेन क्रासओव्हरला अंडरपिन केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांसाठी ग्राहकांना सुरुवातीला तीन आणि चार सिलेंडर असलेले पेट्रोल इंजिन आणि दोन चार सिलेंडर असलेले डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. लवकरच एक ॲडिशनल पेट्रोल, डिझेल आणि दोन प्लग इन हायब्रिड पर्याय देण्यात येतील जे 88 किमीपर्यंत इलेक्ट्रिक रेंज देतील..

भारतात कशी होणार लाँच

बीएमडब्ल्यू पुढील वर्षी भारतीय बाजारात एक्स 1 आणि आईएक्स 1 ला लाँच करणार आहे. भारतात लाँच झाल्यावर एक्स1 मर्सिडीज बेंझ GLA, वोल्वो XC40 आणि आगामी ऑडी Q3 सोबत स्पर्धा करेल. दुसरीकडे आयएक्स1 लवकरच लाँच होत असलेल्या किआ ईव्ही 6 आणि अपकमिंग वोल्वो एक्ससी40 रिचार्ज आणि ह्युंडाई आयनिक 5 ला टक्कर देणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.