Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ह्युंदाईची कॉम्पॅक्ट SUV फक्त 21 हजारांत करा बुक… जाणून घ्या कधी होणार लाँच

या नवीन कॉम्पॅक्ट SUV मध्ये व्हेंटिलेटेड सीटचा पर्याय उपलब्ध आहे. 360 डिग्री कॅमेरा, नवीन अपहोल्स्ट्री, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, सनरूफ आणि पार्किंगसह सेंसर्ससारखे फीचर्सही कारमध्ये दिले आहेत. यात ॲप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो, एअर प्युरिफिकेशन सिस्टम आणि मागील एसी व्हेंट्सची कनेक्टिव्हिटी देखील मिळेल.

ह्युंदाईची कॉम्पॅक्ट SUV फक्त 21 हजारांत करा बुक... जाणून घ्या कधी होणार लाँच
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 2:50 PM

ह्युंदाई मोटर्स (Hyundai Motors) या महिन्यात आपल्या सब-कॉम्पॅक्ट एसयुव्हीची फेसलिफ्ट सिरीज लाँच करणार आहे. या कारचे बुकिंग अवघ्या 21,000 रुपयांपासून सुरू करण्यात आले आहे. या कारमध्ये अलेक्सा, गुगल व्हॉईस कंट्रोल असणार आहे. नवीन ह्युंदाई व्हेन्यू 2022 (Hyundai Venue 2022) मध्ये अलेक्सा आणि गुगल व्हाईस असिस्टंट (Google Voice Assistant) हे फीचर्सदेखील देण्यात आले असून यात तुम्हाला फक्त व्हॉईस कमांडच्या सहाय्याने कारची अनेक फीचर्स कंट्रोल करता येणार आहे. ह्युंदाई व्हेन्यू 16 जून रोजी लाँच होणार आहे.

ह्युंदाई जूनमध्ये सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही व्हेन्यूची फेसलिफ्ट सिरीज लाँच करणार आहे. या कारच्या इंजिनशी संबंधित अनेक वैशिष्ट्ये आणि माहिती देखील लिक झाली आहे. यात पेट्रोल-डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध असतील. ह्युंदाईच्या या कारमध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार पेट्रोल किंवा डिझेल इंजिनचा पर्याय निवडता येणार आहे. कंपनीची ही कार 3 इंजिन पर्यायांमध्ये लाँच होणार आहे. हे 6 ट्रिमसह उपलब्ध होणार आहे. यात, एकूण 16 प्रकार लाँच केले जाऊ शकता, अशी माहिती आहे. पेट्रोल इंजिनमध्ये 1.2 लीटर आणि इतर 1.0 लीटर टर्बो GDI चा पर्याय असू शकतो.

हे सुद्धा वाचा

1.5 लीटर डिझेल इंजिन

टर्बो इंजिनवर 118 bhp कमाल पॉवर आणि 172Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास मदत होणार आहे. तर कारला 1.5 लीटर डिझेल इंजिन देखील मिळेल जे 92bhp कमाल पॉवर आणि 240 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक आणि 7 स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही मिळू शकतो.

काय आहे किंमत?

ह्युंदाई व्हेन्यूची किंमत 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते. व्हेन्यू बाजारात मारुती विटारा ब्रेझा फेसलिफ्ट, किया सोनेट, महिंद्रा XUV 300 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करू शकते. व्हेन्यूमध्ये सेफ्टीची काळजी घेण्यात आली आहे. यात 6 एअरबॅग असतील. यासोबतच व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स देखील असतील.

लूकमध्ये अनेक बदल

पुढील ग्रीलमुळे कोणत्याही कारचा लूक अधिक आकर्षक बनत असतो. नवीन ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये क्रेटा आणि टस्कनच्या लूकसारखा कंपनीचे पॅरामेट्रिक डिझाइन ग्रिल असेल. या शिवाय एलईडी हेडलॅंप आणि नवीन डीआरएल याला आणखीनच प्रेक्षणीय बनवतात. त्याचबरोबर कंपनीने कारचा मागील लूक देखील बदलला आहे. त्यात कनेक्टिंग एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत जे त्यात एक नवीन घटक जोडतात. याशिवाय कारच्या अलॉय व्हीलच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे.

कारमध्ये व्हेंटिलेटेड सीटचा पर्याय

ह्युंदाई व्हेन्यूमध्ये कंपनीने इंटिरिअरमध्येही अनेक बदल केले आहेत, यात व्हेंटेलेटेड सीटचा पर्यायही देण्यात आला आहे. यासोबतच 360 डिग्री कॅमेरा, नवीन अपहोल्स्ट्री, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, सनरूफ आणि पार्किंग सेंसर सारखे फीचर्सही कारमध्ये असतील. यात अप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो, एअर प्युरिफिकेशन सिस्टम आणि मागील एसी व्हेंट्सची कनेक्टिव्हिटी देखील मिळेल.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.