Brake Fail पेक्षा पण जास्त खतरनाक आहे ब्रेक फेड, मॅकेनिकही रिपेअर नाही करु शकत
गाडीचे ब्रेक फेल झाल्यास मॅकेनिक दुरुस्त करु शकतो. पण ब्रेक फेड झाल्यास मॅकेनिकही ते दुरुस्त करु शकत नाही. नेमकं काय असतं हे ब्रेक फेड.
रस्त्यावर वेगाने पळणाऱ्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात होताना तुम्ही पाहिले आहेत. पण अशी सुद्धा काही कारणं आहेत, ज्यात ब्रेक फेल न होता, फेड होतात. यामुळे सुद्धा वेगाने पळणारी गाडी न थांबता धडकते. गाडीचे ब्रेक फेड होण्यामागे काय कारणं असतात. यामध्ये कशी दुरुस्ती करता येते? त्या बद्दल आम्ही तुम्हाला इथे सांगतोय. त्यामुळे तुम्ही गाडीला ब्रेक फेड होण्यापासून वाचवू शकता.
गाडीचे ब्रेक फेल होण्यामागे अनेक कारणं असतात. यात सर्वात प्रमुख कारण म्हणजे मेंटेनेंस आणि गाडीची सर्विस न करणं. गाडीचे ब्रेक फेल झाल्यास मॅकेनिक दुरुस्त करु शकतो. पण ब्रेक फेड झाल्यास मॅकेनिकही ते दुरुस्त करु शकत नाही.
ब्रेक फेड म्हणजे काय?
ब्रेक फेड होणं हे ब्रेक फेल होण्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. डोंगरावर ड्राइव्ह करताना ब्रेक वारंवार युज केल्यामुळे ब्रेक फेड होऊ शकतात. वारंवार ब्रेक यूज केल्यामुळे ब्रेक शू गरम होतात. ब्रेकच कार्य बंद होतं. यालाच ब्रेक फेड म्हणतात.
ब्रेक फेड कसं टाळता येईल?
गाडीचे ब्रेक फेड होऊ नयेत, यासाठी डोंगरावर ड्राइव करताना ब्रेकचा वापर गरज असेल, तेव्हाच करा. त्याशिवाय डोंगरावर गाडी चालवताना समतल रोड दिसल्यास गाडी थांबवून ब्रेक शू ला ठंड होऊ द्या. त्याशिवाय गाडीची सर्विस वेळेवर केली पाहिजे. वेळोवेळी गाडीचे ब्रेक फ्लुइड लीकेज चेक करा. असं केल्यास गाडीच्या ब्रेक फेड होण्याची शक्यता कमी होते.