कॉम्पॅक्ट डिझाईनसह तगडे फीचर्स, अवघ्या 2.78 लाखात घरी न्या Honda ची शानदार कार

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत.

कॉम्पॅक्ट डिझाईनसह तगडे फीचर्स, अवघ्या 2.78 लाखात घरी न्या Honda ची शानदार कार
Second Hand Honda Car
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 4:25 PM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bring home Honda Brio in just 278000 rupees)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 4.8 – 5.5 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच सध्या इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ग्राहक अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ही डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

आज आम्ही तुम्हाला Honda Brio 1.2 E MT I VTEC कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. या कारचे मायलेज आणि मेंटेनन्स खूप चांगला आहे. Honda Brio मध्ये 1198cc चे इंजिन देण्यात आले आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. Car Dekho वेबसाइटनुसार, ही कार 18.5 kmpl इतकं मायलेज देऊ शकते. पेट्रोलवर चालणारी ही कार 4 सिलिंडरसह येते.

या कारमधील इंजिन 4500rpm वर 109 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तर 6000rpm वर 86.8bhp पॉवर जनरेट करु शकते. होंडाच्या या कारमध्ये 35 लिटरची इंधन टाकी आहे. तसेच, या कारला ऑक्टोबर 2022 पर्यंतचा विमा देण्यात आला आहे. या कारमध्ये 175 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 165 मिमी इतका आहे. या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टिम देण्यात आली आहे.

Cars24 नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध असलेली ही कार 2012 चे मॉडेल असून ती 27 हजार किलोमीटरपर्यंत धावली आहे. ही कार दिल्लीच्या DL-13 RTO मध्ये नोंदणीकृत आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(bring home Honda Brio in just 278000 rupees)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.