धमाकेदार ऑफर! अवघ्या 2.4 लाखात घरी न्या शानदार Maruti Suzuki Alto

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Discount Offer) माहिती देणार आहोत,

धमाकेदार ऑफर! अवघ्या 2.4 लाखात घरी न्या शानदार Maruti Suzuki Alto
Maruti Suzuki Alto 800 ही पेट्रोलवर चालणारी कार OLX वर लिस्टेड आहे आणि कारचे 2013 चे मॉडेल आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे. ही कार मध्य प्रदेशच्या RTO मध्ये रजिस्टर्ड आहे. हा फोटो प्रातिनिधिक आहे. (Photo Source: maruti)
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 8:45 AM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Discount Offer) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे (Budget) चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 4.50 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच सध्या इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ग्राहक अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ही डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी अल्टो एलएक्सआय (Maruti Suzuki Alto 800 LXI ) कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. कंपनीने ही कार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे.

Maruti Alto 800 LXI चं हे 2014 मधील मॉडेल असून ही पेट्रोल कार आहे. ही सेकेंड ओनर कार असून महाराष्ट्रातल्या MH12 या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. यामध्ये 796 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्यूअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार आतापर्यंत 1,14,574 किमी धावली आहे. या कारवर थर्ड पार्टी इन्श्योरन्स उपलब्ध आहे.

हे वाहन सध्या CARS24 वर सूचीबद्ध आहे, जिथे त्याची किंमत 2,44,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही सेकेंड ओनर कार असून जून 2014 चे मॉडेल आहे. ही कार आतापर्यंत 1,14,574 किलोमीटर धावली आहे. या कारची नोंदणी MH12 RTO मध्ये आहे. यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, अथवा याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या लिंकवर (https://www.cars24.com/buy-used-Maruti-Alto-800-2014-cars-Pune-1069237240/) जाऊन माहिती घेऊ शकता.

मनी बॅक गॅरंटी

ही कार खरेदी केल्यावर तुम्हाला 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील मिळेल. दुसरीकडे, जर तुमचे बजेट कमी असेल तर कंपनी या कारवर कर्जाची सुविधा देखील देते. यासाठी तुम्हाला झिरो डाउनपेमेंट करावे लागेल आणि तुम्हाला दर महिन्याला 5,691 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. तसेच कंपनीने फ्री होम डिलीव्हरीचा पर्यायदेखील दिला आहे. या कारवर 6 महिन्यांची वॉरंटीदेखील मिळेल.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

Budget 2022 : इलेक्ट्रिक वाहनं कमी व्याजदरासह खरेदी करता येणार? अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी SMEV मागण्या सादर

Budget 2022 : सेकेंड हँड वाहने स्वस्त होणार? Used Cars वरील GST दर कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

Budget 2022 : दुचाकी स्वस्त होणार? GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.