अवघ्या 1.2 लाखात घरी न्या Maruti WagonR, झिरो डाउनपेमेंटसह स्पेशल ऑफर

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

अवघ्या 1.2 लाखात घरी न्या Maruti WagonR, झिरो डाउनपेमेंटसह स्पेशल ऑफर
Maruti WagonR
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 3:24 PM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bring home Maruti WagonR for just 120000 rupees)

कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्हाला शोरुममधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला 4-5 लाख रुपये मोजावे लागतील. तसेच सध्या इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ग्राहक अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ही डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

फीचर्स

आज आम्ही तुम्हाला Maruti WagonR कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. कारचे मायलेज आणि मेंटेनन्स खूप चांगला आहे. Maruti WagonR च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये तुम्हाला 1197cc चे इंजिन मिळते ज्यात 1.0 लीटर आणि 1.2 लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन प्रकार देण्यात आले आहेत. 1.0 लीटर इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 68PS पॉवर आणि 90Nm पीक टॉर्क मिळेल. तुम्हाला इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

32kmpl मायलेज

कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ते पेट्रोलवर ही कार 21.79 kmpl आणि CNG वर 32.52 kmpl चे मायलेज देते. ही कार सध्या CARS24 वर सूचीबद्ध आहे, जिथे त्याची किंमत 1.2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे 2009 चे मॉडेल आहे. ही कार आतापर्यंत 76,789 किलोमीटर धावली आहे. या कारची नोंदणी DL-9C RTO ची आहे.

झिरो डाउनपेमेंट

ही कार खरेदी केल्यावर तुम्हाला 6 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील मिळेल. दुसरीकडे, जर तुमचे बजेट कमी असेल तर कंपनी या कारवर कर्जाची सुविधा देखील देते. यामध्ये तुम्हाला झिरो डाउनपेमेंट पर्यायदेखील मिळेल.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(bring home Maruti WagonR for just 120000 rupees)

एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.